Makar Sankranti Panchang saam tv
राशिभविष्य

Makar Sankranti Panchang: मकर संक्रातीच्या दिवशी कृष्ण एकादशीचा योग; जाणून घ्या आजचं पंचांग आणि लकी राशी

Makar Sankranti Krishna Ekadashi lucky zodiac signs: आजचा दिवस धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत विशेष आहे. मकर संक्रांती आणि कृष्ण एकादशी हे दोन महत्त्वाचे दिवस यंदा एकाच दिवशी आले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आज १४ जानेवारी २०२६ असून मकर संक्रातीचा दिवस आहे. शिशिर ऋतूतील हा बुधवार संयम आणि नियोजनासाठी योग्य मानण्यात येणार आहे. कृष्ण एकादशी तिथी असल्याने धार्मिक, आध्यात्मिक त्याचप्रमाणे चांगल्या जीवनशैलीकडे कल राहणार आहे. चंद्र वृश्चिक राशीत असल्यामुळे भावनांची तीव्रता वाढू शकते, पण योग्य नियंत्रण ठेवल्यास महत्त्वाचे निर्णय ठामपणे घेता येतील. आजच्या दिवशी कसं असेल पंचांग जाणून घेऊया.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण एकादशी

  • नक्षत्र – अनुराधा

  • करण – बालव

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – गंड (सायं. 07:43:55 पर्यंत)

  • दिन – बुधवार

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – पौष

  • माह (पूर्णिमान्ता) – माघ

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 12:13:19 PM ते 01:33:18 PM

यमघंट काल – 08:13:22 AM ते 09:33:21 AM

गुलिकाल – 10:53:20 AM ते 12:13:19 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:52:00 AM ते 12:34:00 PM

या राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ठरणार लकी

वृश्चिक

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल असणार आहे. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास कामात अपेक्षित यश मिळू शकते.

कर्क

आज कुटुंबाशी संबंधित विषयांमध्ये समाधान मिळणार आहे. जुने प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. संयम ठेवल्यास आर्थिक व मानसिक स्थैर्य वाढेल.

मीन

अनुराधा नक्षत्राचा प्रभाव तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारा ठरणार आहे. सर्जनशील कामात प्रगती होणार आहे. आध्यात्मिक किंवा मानसिक शांतता देणारे अनुभव येऊ शकतात.

मकर

कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या यशस्वीपणे पार पाडता येतील. वरिष्ठांकडून विश्वास मिळू शकणार आहे. दीर्घकालीन योजनांसाठी आजचा दिवस उपयोगी ठरेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT