Horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope: येणारी संधी सोडू नका, या ५ राशींच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळणार; वाचा रविवारचे खास राशीभविष्य

Daily Horoscope News: आजचे राशीभविष्य जाणून घ्या. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात कोणत्या राशींना यश, कोणत्या राशींना सावधगिरीची गरज आहे ते वाचा.

Sakshi Sunil Jadhav

मेष
आज कष्टाशिवाय यश मिळणार नाही. घर आणि ऑफिसमधील जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्या लागतील. नवीन लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका, कामात स्मार्ट वर्किंगवर भर द्या.

वृषभ
आजचा दिवस उत्साहवर्धक ठरेल. नोकरीत बदल किंवा प्रगतीची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून मित्रांसोबत वेळ घालवण्याचे योग आहेत.

मिथुन
कुटुंबाशी नाते अधिक घट्ट होतील. आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. क्रिएटिव्ह कामात यश मिळेल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल.

कर्क
आज महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण होतील. व्यवसायात आत्मविश्वास वाढलेला दिसेल. स्पर्धेत यश मिळेल, मात्र मन थोडे अस्थिर राहू शकते.

सिंह
आत्मविश्वासात थोडी घट जाणवेल. सकाळी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाचा सल्ला उपयोगी ठरेल, घरात सुख-समृद्धी राहील.

कन्या
आज सोशल अ‍ॅक्टिव्हिटी वाढतील. चर्चांमध्ये तुमचा प्रभाव दिसून येईल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल आणि बचतीकडे लक्ष द्याल.

तुळ
अनपेक्षित घटना घडू शकतात, त्यामुळे सावध राहा. योग्य सल्ला घेतल्यास गोष्टी सुरळीत होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते.

वृश्चिक
आर्थिक स्थिती मजबूत होईल. चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. बैठका यशस्वी ठरतील आणि कुटुंबात पाहुण्यांची वर्दळ राहील.

धनु
वेळ अनुकूल असून करिअरमध्ये प्रगती दिसेल. मित्रांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. भागीदारी व्यवसायात लाभ होण्याचे संकेत आहेत.

मकर
समोर येणाऱ्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या. वैवाहिक जीवन सुखमय राहील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल.

कुंभ
करिअर आणि व्यवसायात व्यस्तता वाढेल. निर्णय घेताना घाई टाळा. विवेक आणि संयम राखल्यास कामात यश मिळेल.

मीन
आज संवाद आणि माहितीची देवाणघेवाण वाढेल. सहकार्याने काम केल्यास फायदा होईल.
भावंडांशी नाते मजबूत होतील आणि व्यापार अपेक्षेप्रमाणे चालेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

SCROLL FOR NEXT