Sakshi Sunil Jadhav
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली आणि देवबाग या ठिकाणांना पर्यटक ‘मिनी श्रीलंका’ असं म्हणतात. इथलं निळाशार स्वच्छ समुद्र आणि शांत वातावरण लक्ष वेधून घेतं.
तारकर्ली बीच हा महाराष्ट्रातला सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. पांढरी वाळू आणि पारदर्शक पाणी श्रीलंकेतल्या बीचेसची आठवण करून देतं.
समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात असलेल्या नारळ-सुपारीच्या दाट झाडांमुळे इथं अगदी ट्रॉपिकल देशासारखा अनुभव मिळतो.
देवबागमध्ये करळी नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहायला मिळतो. हा नजारा पर्यटकांसाठी खास आकर्षणाचा असतो.
तारकर्ली हे महाराष्ट्रातील स्कुबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. स्नॉर्केलिंग, बोट राईडसारख्या अॅक्टिव्हिटीजही ईथे उपलब्ध आहेत.
गोवा किंवा परदेशी बीचेससारखंच या ठिकाणी गर्दी नसल्याने कुटुंबासोबत किंवा कपल्ससाठी हे ठिकाण जास्त सुरक्षित आणि शांत मानलं जातं.
श्रीलंकेसारखा अनुभव घेण्यासाठी पासपोर्ट किंवा मोठा खर्च न करता महाराष्ट्रातच परदेशी Vibe अनुभवता येतो.
ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांमध्ये तारकर्ली–देवबाग भेटीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात हवामान सुंदर असतं.