Daily Horoscope Today Marathi  Saam TV
राशिभविष्य

Sunday Horoscope: मेहनतीशिवाय फळ नाही हे कळेल, ५ राशींना पैशाची तंगी भासेल, वाचा रविवारचे खास राशीभविष्य

7 December 2025 Rashi Bhavisha: 12 राशींसाठी रविवारचा सुट्टीचा दिवस कसा जाईल. काय फळ मिळेल? जाणून घेण्यासाठी वाचा राशीभविष्य.

Anjali Potdar

रविवार,७ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष,

संकष्ट चतुर्थी.

तिथी-तृतीया १८|२५

रास-मिथुन २२|३९ नं. कर्क

नक्षत्र-पुनर्वसु

योग-शुक्ल

करण-वणिज

दिनविशेष- ८ प.चांगला

रविवारचे राशीभविष्य

मेष

यश खेचून आणण्यासाठी वेगळी स्वप्न बघावे लागतात. आपली जिद्द आणि चिकाटी यात सातत्य असेल तर एक वेगळा पराक्रम गाजवला जाईल. आज असा दिवस आहे. जबाबदारी आली तरी सुद्धा न डगमगता पुढे जाल.

वृषभ

जुनी येणी वसूल होणार आहेत. मन आनंदी राहील. अचानक धनलाभ होईल. वारसा हक्काची संपत्ती, बँक, मुदत ठेवी, त्यामधून मिळणारे व्याज यामुळे दिवस आज धनासाठी मालामाल असेल.

मिथुन

तशा आपल्या राशीला नाविन्याची शोध कायमच असते. आज नवीन दिशा, नवीन मार्ग चोखाळण्यामध्ये व्यस्त रहाल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना सुख देतील.

कर्क

दिवसात काही त्रास नाही तर तो दिवस कसा! असे काहीसे आज वाटून जाईल. वाहने जपून चालवावीत. मनस्तापहि वाढण्याचे योग आहे. अध्यात्माकडे कल ठेवा यातून बाहेर पडाल.

सिंह

कामाची नव्याने साखळी जोडण्यासाठी नवीन परिचय व्हावे लागतात. आज नव्याने परिचय होतील. आपल्या प्रियजनांचा सहवासही लाभेल. अनेक दिवस रेंगाळलेले महत्त्वाचे पत्र व्यवहार सुद्धा पार पडणार आहेत.

कन्या

सर्व काही नसताना प्रगती होती आहे असे दिसेल. तुमचे बौद्धिकतेवर कोणालाही शंका येणार नाही.तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नव्याने प्रसिद्धी मिळेल. एकूणच काय तर तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तूळ

आयुष्य हे सुखदुःखाने भरलेले आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आज सुखाच्या काही गोष्टी आपल्या पदरात येणार आहेत. एखादी भाग्यकाराचा घटना घडेल. गणेश उपासना करा संकष्टी चतुर्थी आहे. आरोग्यही उत्तम राहील.

वृश्चिक

"आरोग्य धनसंपदा" हे लक्षात ठेवा. चुकीच्या सवयीमुळे आज आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाचा डोंगर पुढे उभे असताना मनोबल मात्र कमी राहील. काळजी घ्यावी.

धनु

वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. एकमेकांच्या मुळे उत्साह आणि उमेद सुद्धा वाढणार आहे. संसारिक आणि व्यवसायिक दोन्ही जबाबदाऱ्या आज संतुलित कराल.

मकर

कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने पुढे जाल. आज हितशत्रूंचा त्रासही संभवतो आहे. येणाऱ्या गोष्टींना धाडसाने तोंड देणे याशिवाय आज दुसरा काही पर्याय असू शकत नाही.

कुंभ

एखादी मोठी कामगिरी आपल्या हातून होणार आहे. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील.आर्थिक क्षेत्रामध्ये घोडदौड चांगली होईल. दिवस चांगला आहे. गणेश उपासना करावी. संकष्टी फलदायी ठरेल.

मीन

प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. गुरे - ढोरे ,शेती क्रय विक्रय यामध्ये फायदा दिसतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारू पिऊन सारखा त्रास द्यायचा; बायकोची सटकली, जबर मारहाणीत पतीचा मृत्यू

LPG Cylinder: बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

Bhoplyache Soup Recipe : गरमागरम भोपळ्याचे सूप कधी प्यायलात का? एका घोटात येईल तरतरी

Maharashtra Live News Update: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर

Lpg Gas Cylinder: तुमच्या किचनमध्ये कोणतं इंधन वापरतात? LPG, PNG, CNG आणि LNG नेमका वापर काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT