Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Sunday Horoscope In Marathi : आज काही राशींचे लोक यशाच्या अगदी जवळ जातील. काही लोकांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

रविवार,१९ ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष,शिवरात्रि.

तिथी-त्रयोदशी १३|५२

नक्षत्र-उत्तरा

रास-कन्या

योग-ऐंद्र

करण-वणिज

दिनविशेष-त्रयोदशी वर्ज्य

मेष - कोणाचीतरी प्रेरणा घेऊन आज पुढे जाल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. दिवस धावपळीचा असला तरी दिवसाच्या शेवटी स्वस्थता लाभेल. संमिश्र फलिते मिळतील.

वृषभ - "प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी" मुग्ध आणि अबोल प्रेमात आज धुंद राहाल. दिवस रसरशीत आणि मनस्वी जगण्यासाठी प्रयत्न कराल. उपासनेला दिवस उत्तम आहे. लक्ष्मी उपासना करावी.

मिथुन - विविध गुणांनी नटलेली आपली रास आहे. लोकांच्या मिसळायलाही आपल्याला आवडते. आज घरी पाहुण्यांची ऊठबस होईल. एकत्रितरित्या कुटुंबीयांच्या मध्ये मिसळून आनंदी क्षणात सहभाग घ्याल.

कर्क - बहिणीचे प्रेमाने माया आज लाभणार आहे. सहजगतीने दिवस मोठे यश पदरात पडणार आहे. अडकलेले पत्रव्यवहार मार्गी लागतील. घरासाठी खर्च होईल. दिवस चांगला आहे.

सिंह- धन - दौलत, मुदत ठेवी, पैसा अडका यासाठीचे गुंतवणुकीला महत्त्वाचे निर्णय घ्याल. आजचा दिवस चांगला आहे. घरातील लोकांच्याकडून एक वेगळा आदर आपल्याला मिळेल.

कन्या - बौद्धिक पातळी उत्तम असणारी आपली रास आहे. नवनवीन गोष्टी शिकायला नेहमीच आवडते. आज एखाद्या गोष्टीत समरसून जगायला आवडेल. इतरांवर आपला प्रभाव राहील. वक्तृत्व कला बहरेल.

तूळ - उगाचच नको ते सोपस्कार आज करावे लागतील. कारण नसताना बंधन योग येतील. विनाकारण आपल्याविषयी अफवा सुध्दा उठतील. परदेश गमनाचे योग आणि त्याविषयी निर्णय आज पार पडतील.

वृश्चिक- मैत्रीचे बंध घट्ट होतील. एकमेकांसाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यामधून आपली प्रगती आहे. जुन्या गुंतवणुकीतून विशेष लाभ होण्याचा आजचा दिवस आहे. सुन, जावई, स्नेहीजन यांच्या प्रेमामधून एक वेगळा दिलासा जीवन जगण्यात मिळणार आहे.

धनु - कर्मप्रधानत्व ठेवून पुढे जाल. कार्यक्षेत्रात नव्याने बाजी मारणार आहात. आपले सहकारी कनिष्ठ आणि ज्येष्ठ या सगळ्यांच्याकडून आपण केलेल्या आजपर्यंतच्या कामाची पावती मिळणार आहे. दिवसाचा आनंद यामुळे द्विगुणीत होईल.

मकर - "लेट पण थेट" जाणारी आपली रास आहे. काही मोठ्या प्रवासाचे बेत आज पक्के होतील. शिव उपासना विशेष फायद्याची ठरेल. आयुष्यामध्ये यश अगदी जवळ आहे अशी भावना आज निर्माण होईल.

कुंभ - जोडीदाराकडून धनलाभाची शक्यता आहे. मात्र काही कामे एकट्यालाच आणि नेटाने करावी लागतील. परिश्रमांची शर्थ होईल. तरीसुद्धा त्यातून सुयोग्य मार्ग काढला जाईल.

मीन - व्यवसायिक भागीदारी मध्ये आगेकुछ होईल. एकमेकांचे निर्णय व्यवसाय वृद्धीसाठी फायदेशीर ठरतील. नवनवीन संकल्पनांनी भारलेला आजचा दिवस आहे. मनाजोग्या गोष्टी घडल्यामुळे धनाची आवक चांगली राहिल्यामुळे दिवस सार्थकी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT