Shreya Maskar
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असलेली फळे खावी. जसे की बेरी, लिंबूवर्गीय फळे, केळी, किवी आणि ॲव्होकॅडो यांचे सेवन करावे.
ओव्यामधील पोषक घटकांमुळे शरीरातील जास्तीचे पाणी आणि मीठ (सोडियम) लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते. जेव्हा शरीरातील सोडियम कमी होते, तेव्हा रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होतो आणि बीपी नियंत्रणात राहतो.
सब्जामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते आणि हृदय, रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, मॅग्नेशियम, फायबर असते. ज्यामुळे हाय बीपी नियंत्रणात राहतो. हे घटक रक्तवाहिन्या शिथिल करून, कोलेस्ट्रॉल कमी करून आणि रक्तप्रवाह सुधारून नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
ब्रोकोली नियमित खाल्ल्याने रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका कमी होतो. शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करून उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
आठवड्यातून किमान दोनदा-तीनदा बीन्स खाल्ल्याने रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. बीन्समधील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकून उच्च रक्तदाबनैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यास मदत करतात.
डाळींमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. पोटॅशियम रक्तप्रवाह सुधारते आणि शरीरातील सोडियमचे दुष्परिणाम कमी करते. डाळीमधील फायबर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.