High Blood Pressure : फक्त हृदय नाही, तर शरीराच्या 'या' भागांवरही होतो हाय BP चा परिणाम

Shreya Maskar

हृदयाचे आजार

उच्च रक्तदाबामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे आणि कोरोनरी आर्टरी डिजीज (हृदयधमनीचा आजार) यांसारखे आजार होऊ शकतात.

Heart Diseases | pinterest

स्ट्रोक

स्ट्रोक (Brain Stroke) म्हणजे मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे मेंदूच्या पेशी निकामी होणे किंवा मरणे.उच्च रक्तदाब मुळे मेंदूतील रक्तवाहिन्या कमकुवत, कडक किंवा अरुंद होतात, ज्यामुळे रक्तपुरवठा खंडित होऊन स्ट्रोक होतो.

Stroke | pinterest

पक्षाघात (लकवा मारणे)

उच्च रक्तदाब हे पक्षाघाताचे प्रमुख कारण आहे. जेव्हा रक्तदाब सतत जास्त राहतो, तेव्हा तो मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचे नुकसान करतो. यामुळे मुख्यत पक्षाघात होऊ शकतो. याचे दोन प्रकार आहेत.

Paralysis | pinterest

मूत्रपिंड निकामी होणे

उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचू शकते, ज्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते किंवा क्रोनिक किडनी डिजीज होऊ शकतो.

Kidney Failure | pinterest

डोळ्यांचे नुकसान

दीर्घकाळ BP अनियंत्रित राहिल्यास डोळ्यांच्या आतील रक्तवाहिन्यांवर ताण पडून दृष्टी कायमची जाण्याचा धोका असतो.

Eye Damage | pinterest

स्मृतिभ्रंश

मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे स्मृतिभ्रंश होतो. स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता, भाषा, निर्णय क्षमता आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो.

Dementia | pinterest

हाय बीपी कसा कंट्रोल करावा?

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी टेन्शन घेणे कमी करा. तसेच हेल्दी खा आणि नियमित व्यायाम करा. मीठाचे प्रमाण कमी करा. मद्यपानावर नियंत्रण ठेवा.

Control High Blood Pressure | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : हाय BP च्या औषधांना कंटाळलात? 'या' ५ आयुर्वेदिक उपायांनी रक्तदाब राहील नियंत्रणात

High Blood Pressure | yandex
येथे क्लिक करा...