Shreya Maskar
एका कप ताज्या काढलेल्या पीचच्या रसात (peach juice) एक चमचा धणे आणि चिमूटभर वेलची घाला. उच्च रक्तदाब कमी करण्यास हे खूप फायदेशीर ठरते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा प्या.
मुगाच्या डाळीचे सूप प्या. त्यात थोडी कोथिंबीर, जिरे आणि चिमूटभर हळद घाला. मुगाची डाळ उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
मधाचे पाणी प्यायल्याने त्वरित बीपी कंट्रोलमध्ये येतो. एका कप गरम पाण्यात एक चमचा मध आणि ५ ते १० थेंब 'ॲपल सायडर व्हिनेगर' घालून मिक्स करा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.
मधाचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. तसेच रक्तवाहिन्यांचे प्रसरण सुरळीत ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत मिळते.
संत्र्याचा रस आणि नारळाचे पाणी सम प्रमाणात एकत्र करा. हे मिश्रण अर्धा ते एक कप दिवसातून एकदा प्या. बीपी नियंत्रणात राहील आणि अस्वस्थ वाटणार नाही.
काकडीचे रायते हे एक उत्तम मूत्रवर्धक (diuretic) मानले जाते. ते रक्तदाबासोबतच पचनसंस्थेचे आरोग्यही नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
कलिंगडाचे सेवन करताना त्यावर चिमूटभर वेलची आणि चिमूटभर धणे भुरभुरून खा. हे मिश्रण रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.