Shreya Maskar
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी आपल्या आहाराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जरी फळे आरोग्यासाठी चांगली असली, तरी काही फळे किंवा फळांचे प्रकार बीपी वाढवू शकतात.
पॅक फ्रूट्स आणि फळांचे रस खाणे टाळा. कारण यात साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते आणि चयापचय क्रियेत बदल होतो. अप्रत्यक्षपणे रक्तदाब वाढवू शकतो.
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी ग्रेपफ्रूट कधीच खाऊ नका. हे एक लिंबूवर्गीय फळ आहे. कारण ते रक्तदाबाच्या औषधांशी Interact करते.
ज्या लोकांना जास्तच हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी सुकवलेली फळे खाणे टाळा. कारण सुकवलेली फळे ठिकवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात मीठ आणि साखर वापरली जाते. जी रक्तदाबासाठी घातक ठरते.
लिंबूवर्गीय फळे खाणे टाळा. यात संत्री, लिंबू, मोसंबी, द्राक्षे यांचा समावेश आहे. यात पोटॅशियम आणि सायट्रिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते, जे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी विशिष्ट परिस्थितीत घातक ठरू शकते.
ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, केळी, डाळिंबे, कीवी, सफरचंद्र, बीटरूठ इत्यादी फळे खावी. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.