Surya Gochar  Saam Tv
राशिभविष्य

Surya Gochar 2026: शुक्राच्या घरात सूर्य करणार प्रवेश; या ३ राशींच्या आयुष्यात येणार नव्याने आनंद

Sun Transit April 2026 : सूर्य भरणी नक्षत्रात आणि नंतर वृषभ राशीत प्रवेश करत आहे. या गोचरामुळे कर्क, सिंह आणि धनु राशींसाठी करिअर, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात प्रगतीची मोठी संधी निर्माण होणार असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात.

Surabhi Jayashree Jagdish

२८ एप्रिल रोजी सूर्य शुक्राच्या अधिपत्याखालील भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर १५ मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. ही देखील शुक्राच्या अधिपत्याखाली आहे. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, हा काळ चार विशिष्ट राशींसाठी विशेष महत्त्वाचा आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, या काळात काही राशींच्या व्यक्तींना लाभाच्या अनपेक्षित संधी मिळू शकणार आहेत. तर काहींना अगदी कमी प्रयत्नांतूनही उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. असा काळ करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये चांगली बातमी आणि नवीन संधी घेऊन येईल. यावेळी कोणत्या राशींना चांगली संधी मिळणार आहे ते पाहूयात.

कर्क रास

तुम्ही तुमच्या कामात किंवा व्यवसायात एक महत्त्वाचा टप्पा गाठू शकता. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. तुमच्यावर कर्ज किंवा देणी असल्यास, तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे.

सिंह रास

बऱ्याच काळापासून अडकलेलं पैसे आता वसूल होणार आहेत. जर तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य आहे. दुकान उघडणं असो किंवा नवीन स्टार्टअप, नफ्याची शक्यता प्रबळ आहे. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील.

धनु रास

या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. खर्च आपोआप कमी होईल आणि अनावश्यक गोष्टींवर पैसा वाया जाणार नाही. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहणार आहे. प्रार्थना आणि ध्यानामध्ये आवड वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन आणि फायदेशीर संधी उपलब्ध होतील.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT