Chandra Surya Yuti saam tv
राशिभविष्य

Mangal Surya Yuti: 18 वर्षांनंतर एकमेकांच्या जवळ येणार सूर्य-मंगळ; या राशींची होणार चांदीच चांदी

Mangal Surya Yuti 2025: ज्योतिषांच्या मते, १८ वर्षांनंतर सूर्य आणि मंगळ एकमेकांच्या जवळ येणार आहेत. हा ग्रहयोग अत्यंत दुर्मिळ असून, काही राशींसाठी तो विशेष लाभदायक ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगल हा अत्यंत शक्तिशाली ग्रह मानला जातो. आत्मविश्वास, साहस, ऊर्जा, पराक्रम, जमीन, शक्ती आणि भाऊ यांचं कारकत्व मंगलाकडे आहे. भूमिपुत्र मंगल एखाद्या राशीत साधारण ४५ दिवस राहतो. त्यामुळे एका राशीत पुन्हा येण्यासाठी त्याला सुमारे १८ महिने लागतात. या काळात मंगळ ग्रहाचा इतर ग्रहांशी संयोग होणार आहे.

यंदा डिसेंबर महिन्याच्या मध्यात मंगलाचा ग्रहांचा राजा सूर्याशी संयोग होणार आहे. ७ डिसेंबरला मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी १६ डिसेंबरला सूर्यही या राशीत येणार आङे. परिणाम मंगल-आदित्य योग तयार होणार आहे. या योगामुळे तीन राशींच्या व्यक्तींना अपार यश आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार ते पाहूयात.

७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजून २७ मिनिटांनी मंगल धनु राशीत प्रवेश करेल आणि १६ जानेवारीपर्यंत या राशीत राहणार आहे. दुसरीकडे सूर्य १६ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजून २६ मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी मंगळ आणि सूर्याची युती होणार आहे.

धनु रास (Dhanu Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी मंगल आणि सूर्याचं मिलन अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. लग्नभावात तयार होणारा हा योग बुद्धिमत्ता, ज्ञान, आत्मविश्वास आणि भाग्याला विशेष बळकटी देतो. भाग्य, उत्पन्न आणि कर्म या तिन्हींचा सहयोग लाभदायक ठरणार आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

तूळ रास (Libra Zodiac)

मंगल उच्चस्थानी येऊन या भावात प्रवेश केल्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार आहे. शनि मार्गी झाल्यामुळेही महत्त्वाचे लाभ मिळणार आहे. वर्ष २०२६ नवीन संधी घेऊन येणार आहे. नवीन नोकरी, व्यवसाय, सुरुवात किंवा रोजगाराचे उत्तम पर्याय सहज उपलब्ध होतील.

मिथुन रास (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ आणि सूर्याची युती लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या गोचर कुंडलीच्या सातव्या भावात ही युती होणार आहे. त्यामुळे व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल. या काळात तुमची प्रगती अधिक वेगाने होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. जुने कर्ज, वाद, विमा किंवा गुंतवणुकीत अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : झटपट श्रीमंत व्हायचंय? चाणक्यांच्या 'या' टिप्स लक्षात ठेवा, कधीच कंगाल होणार नाही

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादर

...तरच भाजप राज्यसभेसाठी ५ वा उमेदवार देणार, शरद पवारांसोबत कनेक्शन; देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लान काय?

Peacock Behavior: राष्ट्रीय पक्षी मोर काय खातो? वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? इतका वाढणार पगार

SCROLL FOR NEXT