Chaturgrahi Yog In Dhanu: ५० वर्षांनंतर बनणार चतुर्ग्रही योग; या राशी मानसन्मानासह रातोरात कमावणार पैसा

Chaturgrahi yog: ज्योतिषशास्त्रानुसार ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा दुर्मिळ चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या योगामुळे काही राशींच्या लोकांना अचानक धनलाभ आणि समाजात मान-सन्मान मिळणार आहे.
Chaturgrahi Yog
Chaturgrahi Yogsaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक अंतराने त्यांच्या राशीत किंवा स्थितीमध्ये गोचर करतात. यामुळे त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग निर्माण करतात. याचा थेट परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. डिसेंबर महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत विराजमान राहणार आहे. त्यानंतर मंगळ आणि शुक्र सिंह राशीत प्रवेश करतील.

या चारही ग्रहांमुळे धनु राशीत चतुर्ग्रही योग तयार होईल. या योगामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. यावेळी काही राशींना नोकरीत पदोन्नतीची संधी मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

Chaturgrahi Yog
Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी चतुर्ग्रही योग अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाचा साथ मिळणार आहे. धार्मिक किंवा मंगलकार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. कामकाज किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकणार आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे.

वृश्चिक राशि (Scorpio Zodiac)

चतुर्ग्रही योगामुळे वृश्चिक राशीच्या जातकांचे चांगले दिवस सुरू होतील. हा योग तुमच्या राशीपासून धनभावात तयार होणार आहे. विवाहित व्यक्तींसाठी भौतिक सुख-सुविधा वाढणार आहेत. घरात शांततेचे वातावरण राहू शकणार आहेत. अडकलेले पैसे मिळू शकणार आहेत. यावेळी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

Chaturgrahi Yog
Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

मीन राशि (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग सकारात्मक ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीपासून कर्मभावात तयार होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी ज्युनियर आणि सिनियर यांचा साथ मिळणार आहे. पदोन्नतीची संधी आणि उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. कामकाजाची स्थिती उत्तम राहणार आहे.

Chaturgrahi Yog
Saturn Mercury rare yoga: 30 वर्षांनंतर शनी आणि बुधाने बदलली चाल; या राशींना मिळणार छप्परफाड पैसा, सुवर्णकाळ होणार सुरु

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com