Shravana Nakshatra  saam tv
राशिभविष्य

Shravana Nakshatra : मकर राशीवर श्रवण नक्षत्राचा शनीप्रभाव, मेहनतींसाठी यशाची चाहूल; आरोग्याची काळजी घ्या

Shravana Nakshatra Characteristics : श्रवण नक्षत्र मकर राशीतील असून शनी ग्रहाच्या प्रभावाखाली येते. मेहनती, बुद्धिमान, पाणी संबंधित व्यवसायाची आवड असणारे, तसेच आरोग्यात सर्दी, सांधे दुखीचे त्रास संभवतात.

Sakshi Sunil Jadhav

श्रवण

या नक्षत्राचे चारही चरण मकर राशी मध्ये आहेत. चंद्र या ग्रहाच्या अंलाखाली येणारे नक्षत्र आहे. या लोकांचा स्वभाव काहीसा चंचल, शाशंक मनस्थिती, हसरा, विनोदी, हास्यविनोद करणारे, सहनशील, काहीसे चिडके, कधी संकुचित वृत्ती, तर मध्येच लोकांचा मोठ्या मनाने विचार करणारे असतात. त्यामुळे धरसोड वृत्तीची व्यक्ती म्हणून लोक बोल लावतात. इच्छाशक्ती मात्र जबरदस्त, उत्साही, मातृ-पितृ भक्त, पाण्याच्या संबंधित कामाची आवड असते.

देवाला मानणारे, दूरदृष्टी असणारे, व्यवहारी, समयसूचक, काही वेळा नाहक हट्टीपणा करताना दिसतात. निश्चय केल्यास मात्र निभवून नेतात. शनीच्या राशीमुळे कष्टाळू, दगदग सहन करणारे, शोधक वृत्ती, काहीसे धीमे, पण कष्टाने स्वकर्तुत्वाने नेटाने पराक्रम करणारे असतात. कामात गुंतवून ठेवून त्यात रममान पण ते काम जर पूर्ण झाले नाही तर चिडचिड करणारे असतात. शारीरिक कष्ट पेलवणारी शरीर यष्टि असते.

नोकरी आणि व्यवसाय

या नक्षत्राच्या व्यक्ती मेहनती आणि बुद्धिमान असतात. वकीली क्षेत्र, लहान कारखानदार, श्रम आणि कष्ट करणारा मेहनती वर्ग, धान्य - तेलाचे व्यापारी, पाण्याचे संबंधित व्यवसाय वा नोकरी, वातानुकूलित सामानाचे व्यापारी, दुरुस्ती करणारे, आईस्क्रीम तयार करणारे, विहीर पंपसेट, ट्यूबवेल, कृत्रिम पाणीपुरवठा करणारे, कोळी, प्लंबर, भूमीखाली काम करणारे, खंदक -सुरुंग लावणारे व त्याचे व्यापारी, पाणबुडी चालवणारे, सिंचन पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी असू शक्यता. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींनी सामाजिक किंवा आरोग्य विषयक कार्यक्रम हाती घेतल्यास श्रम आणि मेहनत घेण्याची मानसिक तयारी असून उत्तम प्रकारे पार पाडू शकतात.

रोग व आजार

या नक्षत्राच्या व्यक्तींना सर्दी, मुरणारी सर्दी, रेंगाळणारी सर्दी, त्यामुळे होणारे त्वचेचे रोग, गुडघे सांधे दुखणे, ही सर्दी खूप मुरली तर क्षय, दमा, ताप येण्यापर्यंत त्रास होऊ शकेल. साथीचे रोग, अतिसार, पचनशक्ती कमजोर होणे, वात कफ आणि पित्त एकदम बिघडणे अशा गोष्टी होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Flag History: तिरंग्याच्या इतिहासात दडलेली १० महत्त्वाचे तथ्य तुम्हाला माहित आहे का?

Mumbai Vada Pav: मुंबईत वडापाव विकणाऱ्या ताईचा नादखुळा, ५ भाषा खडाखड बोलते, सोशल मीडियावर एकच चर्चा

Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

Congress setback : काँग्रेसला आणखी एक धक्का, ठाकरे भाजपच्या संपर्कात, विदर्भाचे राजकारण फिरणार!

PM Awas Yojana : घरकुलाचं काम झालं, पण पैसे द्यायला सरकारी अधिकाऱ्याची टाळाटाळ, 20 हजार रुपयांची मागितली लाच

SCROLL FOR NEXT