Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस सेवेत आणखी एक नवी गाडी दाखल होणार आहे.
सध्या राज्यात नागपूर,सिकंदराबाद, हुबळी, पुणे, कोल्हापुर,पुणे, जालना–छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, बिलासपूर–नागपूर, मुंबई सेंट्रल–गांधीनगर, इंदूर–नागपूर, सीएसएमटी–साईनगर शिर्डी, सीएसएमटी–सोलापूर, सीएसएमटी–मडगाव, मुंबई सेंट्रल–अहमदाबाद अशा ११ वंदे भारत गाड्या धावत आहेत.
आता १२ वी वंदे भारत गाडी अजनी (नागपूर) ते पुणे या मार्गावर सुरू होणार आहे.
नव्या सेवेला १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा कंदील मिळणार आहे.
नागपूर आणि पुण्याला जोडणारा हा मार्ग प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. प्रवाशांना वेग, आराम आणि आधुनिक सोयी यांचा उत्तम संगम अनुभवायला मिळणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत सेवेचा नवा टप्पा सुरू होणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्वयंचलित दरवाजे, रोटेशन सीट्स, वायफाय सुविधा, माहिती फलक, बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स आणि अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टम असणार आहे.
अंदाजे ८८१ किलोमीटरचा हा प्रवास महाराष्ट्रातील सर्वात लांब वंदे भारत मार्ग ठरणार आहे.
आठवड्यात सहा दिवस ही सेवा उपलब्ध असेल. एक दिवस देखभाल व तपासणीसाठी राखीव असेल.