Sakshi Sunil Jadhav
भारतामध्ये विविध जातींच्या प्रजाती आढळतात. त्यामध्ये काही विषारी तर काही निरुपद्रवी असतात.
कोकणात, विदर्भात, मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध हवामान सापांसाठी योग्य वातावरण आहे.
सापांच्या ३० पेक्षा जास्त सापांच्या प्रजातीमध्ये कोब्रा, करैत, फुरसे, घोणस यांसारखे विषारी साप मोठ्या प्रमाणात आढळतात.
धान्य, ऊस, भात शेती आणि गवताळ भागांमध्ये सापांचे वास्तव्य जास्त असते.
पावसाळ्यात साप पाण्यामुळे बिळाबाहेर पडतात.
तुमच्या परिसरात जर साप आढळत असतील तर तुम्ही साप घेऊन जाणाऱ्यांना म्हणजेच सर्पमित्रांची मदत घेऊ शकता.
पावसाळ्यात घराभोवती स्वच्छता राखा. कचरा साठू देऊ नका. तसेच अंधार असणाऱ्या जागेत हात घालू नका.