Sakshi Sunil Jadhav
रोजचा भाजी चपातीचा टिफीन कंटाळवाणा वाटतो. तुम्ही धावपळीत कमी वेळात कांद्याचा टेस्टी पराठा तयार करुन खाऊ शकता.
गव्हाचे पीठ, मीठ, तेल,कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे इ.
सर्वप्रथम मीठ एका परातीत घेऊन कणीक मळून घ्या. सोबत तेलाचा वापर करा.
कणिक कपड्यात १५ मिनिटे झाकून ठेवा.
आता कांदा, मिरची, कोथिंबीर, जिरं, मीठ मिक्स करा.
आता पीठाचा गोळा करा. त्यामध्ये कांद्याचे तयार मिश्रण ठेवा आणि हलक्या हाताने गुंडाळा.
आता तवा गरम करा. पराठा आता हलक्या हाताने लाटून शेकवा.
पराठा आता तुपाचा वापर करुन छान शेकवून घ्या. आणि गरमा गरम सर्व्ह करा.