Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Shani Dev Rashi: 'या' राशींवर शनीदेवाची नेहमीच असते कृपा; प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना मिळतं यश

Shani Dev blessings: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव (Lord Saturn) हे कर्मफळ दाता मानले जातात. ते व्यक्तीच्या कर्मानुसार त्यांना फळ देतात. शनिदेव काही राशींवर नेहमीच आपली कृपादृष्टी ठेवतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात, पण ते कठोर परिश्रमाने आणि मेहनतीने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये शनी ग्रहाला अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा ग्रह मानलं जातं. शनी हा अत्यंत संथ गतीने चालणारा ग्रह आहे. तो प्रत्येक राशीत सुमारे अडीच वर्षे स्थिरावतो आणि पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी सुमारे तीस वर्षांचा कालावधी लागतो. शनीला कर्मफलदाता मानलं जातं.

शनी ग्रहाला दुःख, परिश्रम, अडथळे, आजारपण, विरोध, भीती, वृद्धावस्था, दान, दीर्घायुष्य, अपंगत्व इत्यादींचा कारक मानलं जातं. मात्र शनीचा प्रभाव नेहमी नकारात्मक असेलच पडतो असं नाही. कुणाच्या कुंडलीत शनीची स्थिती शुभ असल्यास तो रंकालाही राजा बनवतो. यावेळी शनीच्या प्रिय राशी कोणत्या आहेत ते पाहूयात

वृषभ रास

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून शनी हा त्याचा परममित्र आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपा कायम राहणार आहे. या राशीच्या लोकांना आयुष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. पण ते सहजपणे त्यांवर मात करतात. त्यांना सुख, समृद्धी आणि यश लाभतं.

तूळ रास

तुला राशी ही शनीची उच्च राशी मानली जाते. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर शनीची कृपा कायम असते. तूळ राशीचे लोक परिश्रमी, अनुशासित आणि प्रामाणिक स्वभावाचे असतात. त्यामुळे शनी त्यांच्यावर प्रसन्न राहतो. त्यांच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळते आणि जीवनात सातत्याने प्रगती होते. त्यांना सुख, संपत्ती, मानसिक शांती आणि कौटुंबिक आनंद प्राप्त होतो.

मकर रास

मकर राशीचा स्वामी स्वतः शनी असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर त्याचा थेट प्रभाव असतो. जीवनात संघर्ष आणि अडथळे आले तरी शेवटी या राशीचे लोक यशस्वी ठरतात. ते संयमी, जबाबदार आणि दूरदर्शी असतात. त्यांच्या मनात महत्वाकांक्षा प्रबळ असते, ज्यामुळे ते कठोर परिश्रम करून मोठं उद्दिष्ट साध्य करतात. शनिदेवाच्या कृपेने त्यांची आर्थिक स्थिती हळूहळू स्थिर होते.

कुंभ रास

कुंभ राशी ही शनीची मूलत्रिकोण राशी मानली जाते. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाचे विशेष आशीर्वाद असतात. त्यांचं भाग्य जागृत होतं आणि नव्या संधींचे दरवाजे उघडतात. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते आणि ते प्रत्येक क्षेत्रात उन्नती करतात. या राशीच्या व्यक्तींचे कौटुंबिक जीवन संतुलित राहतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Temple : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ

Solapur Heavy Rain : सोलापुरात मुसळधार; पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात टाकली रिक्षा, चालक गेला वाहून

'अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, ते अर्धे पाकिस्तानी'; संजय राऊतांची जहरी टीका

Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT