September Grah Gochar: सप्टेंबरमध्ये बुध, मंगल आणि शुक्र ग्रह बदलणार चाल; 'या' 3 राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

September 2025 planetary transits: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित वेळी आपली राशी बदलतो, ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. सप्टेंबर महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
September Grah Gochar
September Grah Gocharsaam tv
Published On

ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह, कुंडली आणि नक्षत्रांना खूप मोठं महत्त्व दिलं जातं. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली रास बदलतो आणि त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. जसा ऑगस्ट महिन्यात ग्रहांचा मोठा बदल झाला तसाच सप्टेंबर महिनाही महत्त्वाचा मानला जात आहे.

या महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ या चार प्रमुख ग्रहांचा गोचर होणार असून ते नक्षत्रांमध्येही बदल करणार आहेत. सूर्य-बुध युतीमुळे बुधादित्य योग, बुधाच्या प्रभावामुळे भद्र राजयोग आणि सूर्य-शुक्राच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. देवगुरु बृहस्पती मिथुन राशीत पुनर्वसु नक्षत्रातच स्थिर राहणार आहे. याशिवाय सप्टेंबर महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणही होणार असल्याने हा महिना ज्योतिषशास्त्रीय दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

सप्टेंबर २०२५ मधील ४ मोठे ग्रहगोचर

सूर्य गोचर

१७ सप्टेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या काळात सूर्य पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी आणि हस्त नक्षत्रांमधून भ्रमण करतील.

बुध गोचर

१५ सप्टेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त आणि चित्रा नक्षत्रात राहणार आहेत.

मंगळ गोचर

१३ सप्टेंबर रोजी सेनापती मंगळ तुला राशीत प्रवेश करेल. तो चित्रा आणि स्वाती नक्षत्रांमधून भ्रमण करेल.

शुक्र गोचर

१५ सप्टेंबर रोजी दैत्यांचा गुरु शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्र अश्लेषा, मघा आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रांतून भ्रमण करणार आहे.

September Grah Gochar
Mercury Transit : बुधाच्या गोचरमुळे 'या' राशींना लागणार ग्रहण; आयुष्यात होणार नकोसे बदल, संकंटांचा डोंगरही कोसळणार

या राशींवर होणार परिणाम

मेष रास

या महिन्यात ग्रहगोचर आणि तयार होणारे राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यवर्धक ठरणार आहेत. दीर्घकाळापासून अडकलेलं काम पूर्ण होणार आहेत. नशीब साथ देणार आहे. आर्थिक उत्पन्नासोबत आत्मविश्वासातही वाढ होणार आहे. नोकरीत नवीन संधी मिळतील आणि व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो.

मिथुन रास

सप्टेंबर महिना मिथुन राशीच्या व्यक्तींना अत्यंत उत्तम ठरणार आहे. भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळणार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा फायदा होणार आहे. जमीन खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ अत्यंत लाभदायी ठरेल.

September Grah Gochar
Budh Gochar 2025: 7 दिवसांना बुध करणार नक्षत्र गोचर; बिझनेस आणि नोकरीत मिळणार चांगली संधी

कर्क रास

सप्टेंबर महिन्यात ग्रहगोचर आणि राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतात. नशिबाचा पूर्ण आधार मिळणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. अडकलेली कामं वेगाने पूर्ण होणार आहे.

September Grah Gochar
Ganesh Chaturthi 2025: तुमच्याही घरी गणपती बसणार आहे? बाप्पाची मूर्ती आणताना 'या' 7 नियमांचं पालन अवश्य करा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com