Ganesh Chaturthi Puja 2025
Ganesh Chaturthi Puja 2025saam tv

Ganesh Chaturthi 2025: तुमच्याही घरी गणपती बसणार आहे? बाप्पाची मूर्ती आणताना 'या' 7 नियमांचं पालन अवश्य करा

Ganesh Chaturthi Puja 2025: गणपती बाप्पाला आपल्या घरी आणणे हे केवळ एक धार्मिक कार्य नाही, तर एक आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा असतो. पण, गणपतीची मूर्ती घरी आणताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे
Published on
Summary
  • गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण आहे.

  • यंदा गणेश स्थापना २७ ऑगस्ट रोजी होत आहे.

  • मातीची मूर्ती घरी बसवावी.

महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू धर्मात गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य मानले जातात. कोणताही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते. म्हणूनच गणेशोत्सवाचे महत्व आणखी वाढते. श्रद्धेनुसार गणपती बाप्पाच्या कृपेने बुद्धी, सौभाग्य आणि यश मिळते.

गणेशोत्सव हा १० दिवस चालणारा सण आहे. यावर्षी २७ ऑगस्ट रोजी घराघरांत गणेशमूर्तीची स्थापना होते. त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी गणपतींचं विसर्जन केलं जातं. जर तुम्ही यावर्षी घरी गणपती बसवण्याचा विचार करत असाल तर काही नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे.

Ganesh Chaturthi Puja 2025
गणेश चतुर्थीला करा 'हे' उपाय; कर्जापासून मिळेल मुक्ती

गणेशोत्सवातील महत्वाचे नियम

मातीची मूर्ती बसवा

गणेश चतुर्थीच्या दिवशी नेहमी मातीपासून तयार केलेली मूर्तीच घरात बसवावी. मातीच्या मूर्तीला शुभ मानलं जातं आणि यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही.

गणेशाची सोंड योग्य दिशेला असावी

गणेशमूर्ती घेताना लक्षात ठेवा की मूर्तीतील सूंड उत्तर दिशेला वळलेली असावी. ती सर्वात शुभ मानली जाते.

Ganesh Chaturthi Puja 2025
गणेश चतुर्थीच्या दिवशी नव्या घरात प्रवेश करणं शुभ?

मूर्ती आणताना चेहरा झाकून ठेवा

बाजारातून मूर्ती आणताना शक्यतो मूर्तीचा चेहरा कापडाने झाकून ठेवा. याला शुभ मानले जाते.

मूर्तीची योग्य ठिकाणी स्थापना करा

गणेशमूर्ती घरातील ईशान्य कोनात (ईशान्य दिशेला) बसवणं सर्वात उत्तम मानलं जातं. जर ते ठिकाण उपलब्ध नसेल तर उत्तर-पूर्व दिशेतही स्थापना करता येतं.

Ganesh Chaturthi Puja 2025
Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' रंगाचे कपडे परिधान करा; बाप्पांच्या स्वागतासाठी मानले जातात शुभ

गणेशसेवेसाठी सदस्य हजर असावा

गणेशमूर्ती बसवल्यानंतर घरातील एखादा सदस्य नेहमी गणपती बाप्पाच्या सेवेत असावा.

दररोज पूजा-अर्चा करा

स्थापनेनंतर रोज सकाळ-संध्याकाळ आरती करावी. बाप्पाला नैवेद्य दाखवावा, आसपासची जागा स्वच्छ व व्यवस्थित ठेवावी.

कलश आणि सात्त्विक आहार

मूर्तीच्या स्थापनेसोबत नारळ ठेवून कलशाची स्थापना करावी. तसंच गणपती घरात असताना नेहमी सात्त्विक अन्नच बनवावं.

Q

गणेशोत्सवाची सुरुवात कोणत्या तारखेपासून होते?

A

गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होते.

Q

गणेशमूर्तीची स्थापना कोणत्या दिशेला करावी?

A

गणेशमूर्तीची स्थापना ईशान्य किंवा उत्तर-पूर्व दिशेला करावी.

Q

मूर्ती आणताना चेहरा का झाकावा?

A

शुभतेच्या दृष्टीने मूर्तीचा चेहरा झाकून आणावा.

Q

गणेशोत्सवात कोणता आहार घ्यावा?

A

गणपती घरात असताना सात्त्विक आहार घ्यावा.

Q

गणेशमूर्तीची मूर्ती कशापासून बनवलेली असावी?

A

मातीपासून बनवलेली मूर्ती शुभ मानली जाते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com