Surabhi Jayashree Jagdish
हिंदू धर्मात नवीन घरात प्रवेश करण्यासाठी शुभ मुहूर्त, तिथी आणि दिवस पाहणे अत्यंत आवश्यक मानले जाते. त्या दिवशी गृहप्रवेशाची पूजा केली जाते.
गणेश चतुर्थी चातुर्मासाच्या काळात येते. अशा परिस्थितीत या दिवशी गृहप्रवेश करणे योग्य आहे की नाही, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो
गणेश चतुर्थी गृहप्रवेशासाठी अत्यंत शुभ मानला जाणारा दिवस आहे. यावर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट रोजी आहे.
मान्यता अशी आहे की, कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करून त्यांचं आशीर्वाद घेतले, तर ते काम नक्कीच यशस्वी होते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी नवीन घरात गृहप्रवेश पूजन करता येते.
या दिवशी आपण नवीन घरात गणपती बाप्पांची मूर्ती प्रस्थापित करून त्यांची विधिवत पूजा तसेच गृहप्रवेशाची पूजा करावी.
हा संपूर्ण विधी घरात शुभत्व, समृद्धी आणि आनंद घेऊन येतो.