
गणेश चतुर्थीला पिवळा रंग अत्यंत शुभ मानला जातो.
लाल रंग प्रगती आणि यशाचे प्रतीक मानला जातो.
हिरवा रंग मनाला शांती आणि श्रद्धा देतो.
गणेश चतुर्थी हा सण प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बप्पांच्या आगमनासाठी प्रत्येक जण आपल्या परीने तयारी करतो. घर सजवणं, विविध प्रकारचं गोडधोड बनवणं आणि पूजेची तयारी करणं हे सगळ्यांना महत्त्वाचं वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी घालणाऱ्या कपड्यांचा रंगही तुमच्या पूजेला आणि संपूर्ण वातावरणासाठी शुभ असतो.
या दिवशी योग्य रंगाचे कपडे परिधान केल्याने आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. चला तर मग पाहूया कोणते रंग बाप्पांच्या स्वागतासाठी शुभ मानले जातात.
पिवळा रंग हा नेहमीच उत्साह, आनंद आणि ऊर्जा देणारा मानला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी पिवळा रंग परिधान केल्यास बप्पांची विशेष कृपा मिळते, असं मानलं जातं. हा रंग सूर्यदेवाचं प्रतीक असून तो आरोग्य, प्रकाश आणि सकारात्मकता वाढवतो. पिवळी साडी, कुर्ता किंवा कोणताही पिवळा पोशाख या दिवशी अत्यंत शुभ ठरतो.
लाल रंग हा शक्ती, उन्नती आणि समृद्धीचा द्योतक आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कपडे घातल्याने आयुष्यात प्रगती आणि यश प्राप्त होतं असं मानलं जातं. लाल रंग सणाला वेगळाच उत्साह देतो आणि पूजेला अधिक प्रभावशाली बनवतो. लाल रंगाची साडी, कुर्ता किंवा ड्रेस या दिवशी उत्तम पर्याय ठरतो.
हिरवा रंग हा शांतता, श्रद्धा आणि प्रगतीचं प्रतीक आहे. गणेश चतुर्थीला हिरवा रंग परिधान केल्याने मन प्रसन्न राहतं आणि पूजेच्या वेळी भक्तीभाव अधिक दृढ होतो. हा रंग निसर्गाशी जोडलेला असून हरिताई आणि विकासाचं द्योतक आहे. हिरवी साडी किंवा कुर्ता या दिवशी मनाला शांती देणारा ठरतो.
पांढरा रंग हा शुद्धता आणि पावित्र्य दाखवतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी पांढरे कपडे परिधान केल्याने पूजा अधिक पवित्र आणि शुद्ध वाटते. हा रंग मानसिक शांती आणि संतुलन राखतो.
केशरी रंग हा उत्साह, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा देणारा मानला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान केल्याने घरात उत्साह वाढतो आणि बप्पांची विशेष कृपा लाभते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी कपडे निवडताना रंगाला विशेष महत्त्व द्या. प्रत्येक रंगाची आपली एक खासियत आणि शुभता असते. तुम्हाला जो रंग आवडतो आणि जो तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतो, तो रंग नक्की परिधान करा.
गणेश चतुर्थीला कोणता रंग आनंद आणि समृद्धी आणतो?
पिवळा रंग आनंद, सुख आणि समृद्धीचा द्योतक आहे.
लाल रंग गणेश पूजेसाठी का शुभ मानला जातो?
लाल रंग शक्ती, उन्नती आणि यशाचे प्रतीक आहे.
हिरवा रंग कोणत्या गुणांचा प्रतीक आहे?
हिरवा रंग शांतता, श्रद्धा आणि निसर्गाचा प्रतीक आहे.
पांढरा रंग पूजेला कोणता संदेश देतो?
पांढरा रंग पवित्रता, शुद्धता आणि मानसिक शांती दर्शवतो.
केशरी रंगाचा उपयोग का करावा?
केशरी रंग उत्साह, ऊर्जा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.