शनिवार,१९ जुलै २०२५,आषाढ कृष्णपक्ष.
पुष्य रवि
तिथी-नवमी १४|४३
रास-मेष ३०|१२ नं. वृषभ
नक्षत्र-भरणी
योग-शूल
करण-गरज
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - कुठल्याही गोष्टीची आधीरता उतावेळपणा आज टाळणे गरजेचे आहे. आपल्या राशीचे ते गुणच आहेत. मात्र नव्याने चांगले काहीतरी धाडस आज कराल. त्यामध्ये यश प्राप्ती होईल. दिवस आनंदी आहे.
वृषभ - मोठ्या प्रवासाच्या दृष्टीने नियोजन करत असाल तर आज त्या बैठका पूर्णत्वास जातील. मनोरंजनात्मक गोष्टी, खरेदी, दवाखान्यावर खर्च असे खर्च उद्भवतील. मानसिकता स्थिर ठेवावी लागेल.
मिथुन - जोडलेल्या गोष्टी तोडायला वेळ लागत नाहीत. मात्र आपली रास बोलून एखाद्याला आपलंसं करणारी आहे. जुने मित्र मैत्रिणी यांच्या सर्व चुका माफ करून आज त्यांना जवळ कराल. स्नेहभोजनाचे योग आहेत.
कर्क - कुठून तरी प्रेरणा घेऊन आयुष्यात वाटचाल करावी लागेल. आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये घोडदौड होईल. जवळच्या व्यक्तीकडून शाबासकीची थाप मिळाल्यामुळे कामाला गती येईल.
सिंह - "होय हे असेच आहे असे" म्हणणारी आपली रास. आज मात्र "हे असे का" आहे हे शोधण्याचा प्रयत्न करेल. देवधर्माकडे कल वाढेल. जवळच्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता जाणवेल. रवी उपासना फलदायी ठरेल.
कन्या - "नकळत सारे घडले" असा काहीसा दिवस आहे. ध्यानीमनी नसताना गंडांतर येतील. एकट्याने परिस्थितीशी सामना करावा लागेल. धीर धरून कामे करा.
तूळ - कोर्टकचेरीच्या कामात आज यश मिळेल. नको असलेल्या गोष्टीत विनाकारण आपल्याला अडकवण्यात आले असेल तर न्यायाचे दरवाजे ठोठवावेच लागतात. हे आज समजले असेल. त्यामध्ये जोडीदाराचा सहभाग आणि साथ दोन्हीही असेल.
वृश्चिक - प्रेमरूप आजीबरोबर भावनिक जवळीक संबंध येतील. अर्थात आजोळी मामा बरोबरही संबंध चांगले राहतील. एकूण आजोळ जवळ कराल. शत्रूंवर मात करण्यापेक्षा कटकटी डावलून पुढे जाण्याकडे कल राहील. काळजी घ्या.
धनु - दत्तगुरु आपल्या पाठीशी आहेत अशी खात्री घेऊनच दिवस व्यतीत कराल. विद्यार्थ्यांना योग्य ते यश मिळणार आहे.कामाला नवीन गती आणि चालना मिळेल. दत्त उपासना करावी.
मकर - समाजकारणात आपल्याला रस आहेच पण काही वेळेला "घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं" असे होईल. आज घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. जुन्या नव्या गोष्टींचा संगम आज होईल. दिवस संमिश्र आहे.
कुंभ - मोठे स्वप्न बघायला आपल्याला नेहमीच आवडते. नुसती स्वप्ने पाहणारच नाही तर आज त्याचा पाठपुरावा पण कराल शेजार्यांचे सहकार्य लाभेल. जवळच्या व्यक्तींच्या पाठबळामुळे यश खेचून आणाल.
मीन - जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. वारसा हक्काच्या संपत्ती बाबत काहीतरी अडचणी उद्भवतील. धन योगाला मात्र दिवस चांगला आहे. येणारा दिवस सहर्ष घालवावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.