Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : हॉस्पिटलायझेशनवर खर्च होईल, तब्येतीची काळजी घ्या; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. तर काहींना सावध राहण्याची नितांत गरज आहे.

Anjali Potdar

पंचांग

शनिवार,१३ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

तिथी-नवमी १६|३९

रास-कन्या

नक्षत्र-हस्त

योग-आयुष्मान

करण-गरज

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - पोटाच्या तक्रारी त्रासदायक ठरतील. कदाचित पित्ताचे त्रास, दगदग, धावपळ अशा गोष्टींमुळे अडचणी उदभवतील. दिवसभराचे नियोजन योग्य करणे आज गरजेचे आहे. दिवस संमिश्र आहे.

वृषभ - जेवढे काम कराल तेवढे यश मिळते हे आपल्याला माहिती आहे. पण आज याच गोष्टी तुम्हाला सहज मिळणार आहेत. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. कला, क्रीडा क्षेत्रात सुद्धा प्रगती होईल.

मिथुन - घरामध्ये एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. सर्वजण मिळून आनंदाने हे साजरी कराल. सुख समाधानाची पाऊलवाट नव्याने तयार होत आहे. त्याचा आनंद लुटा. सर्व सौख्याला दिवस चांगला.

कर्क- प्रवासा मधून फायदा होईल. शेजारील व्यक्तीकडून वेळेला सहकार्य मिळेल. समाजात सन्मानही मिळतील. दिवस चांगला आहे. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा.

सिंह - कामाच्या ठिकाणी अडचणी आल्या तरी त्यावर तुम्ही मात करून पुढे जाल. जोडीदाराच्या तब्येतीची मात्र आज काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक सौख्य आज चांगले राहणार आहे. धनाची आवक जावक खेळती राहील.

कन्या - स्वतःचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी आज कराल. मन आनंदी आणि स्वस्थ राहील. निगेटिव्ह विचार नकारात्मक गोष्टी वेळीच झटकलेल्या बऱ्या असतात. हे आज जाणवेल. घेतलेले निर्णय योग्य ठरतील.

तुळ - नवीन काही गोष्टी शिकण्याचा अट्टाहास आज करत असाल तर त्या तशाच होतील असं वाटत नाही. विद्यार्थ्यांना विनाकारण अडचणी येतील. हॉस्पिटलायझेशन वर खर्च होईल. काळजी घ्या .

वृश्चिक - जेवढे दिले जाते तितके आयुष्यात मिळतेच असे नाही. पण आज मात्र अनेक लाभ मिळण्याची योग आहेत. मग ते मैत्रीचे असो, धनाचे असो, व्यक्तीचे असो किंवा कर्माचे असो. दिवस चांगला जाईल.

धनु - कार्यक्षेत्रामध्ये आपल्या वाढ होणार आहे. सकारात्मकते बरोबरच योग्य ती धावपळ आणि धाडस केल्यामुळे यश आज पदरात पडेल. इतरांपेक्षा चार पावले आपण पुढे आहोत हे आज जाणवेल.

मकर - चर असणारी आपली रास आहे. आज प्रवासाचे योग आहेत. साधेपणाने शांततेने दिवस जाईल. भाग्य तुमची वाट पाहत आहे.

कुंभ - संशोधनात्मक कार्यात गती आणि प्रगती आहे. इतरांवर जास्त अवलंबून किंवा विश्वास ठेवून आज चालणार नाही. स्वतः कामांमध्ये झोकून देऊन कामे केल्यास यश तुमचे आहे.

मीन - संसारिक सुखाची आस आणि लालसा वाढेल. जोडीदाराच्या बरोबर चार चांगल्या गोष्टी कराल. कामासाठी एक वेगळा हुरूप घेऊन आज जगाल. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

SCROLL FOR NEXT