Manasvi Choudhary
कडुलिंब आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. कडुलिंबाचा रस चवीला कडू असला तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
कडुलिंबाचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील पिपंल्स आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते.
कडुलिंब हे नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल आहे. यामुळे कडूलिंबाचा रस करून प्यायल्याने शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे पिंपल्स येणे थांबते आणि जुन्या पिंपल्सची सूज कमी होते.
कडुलिंबाचा रस नियमितपणे प्यायल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे हळूहळू कमी होतात.
कडुलिंब फ्री-रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा दीर्घकाळ तरुण आणि घट्ट राहते.
कडूलिंबाचा रस बनवण्यासाठी कोवळ्या कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून थोड्या पाण्यासह मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि तो रस गाळून घ्या.
या रसमध्ये मध आणि लिंबाचा रस देखील मिक्स करा म्हणजे जास्त कडू लागणार नाही. आठवड्यातून फक्त ३-४ वेळा किंवा १५ दिवस सलग घेऊन पुन्हा ब्रेक द्यावा.