TODAY HOROSCOPE  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : नात्यातला गोडवा वाढेल, ५ राशींच्या व्यक्तींना आश्चर्याचा धक्का बसेल; वाचा रविवारचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha : 12 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात रविवारी काय चमत्कार होणार? जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य.

Sakshi Sunil Jadhav

मेष : आज दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामातल्या आव्हानांचा धैर्याने सामना कराल. नवीन बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. व्यवसायात लाभाचे संकेत असून आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ : आज दिवस सामान्य पण सकारात्मक राहील. कामावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. ऑफिसमधला वाद-विवाद टाळा आणि शांत राहा. जंक फूड टाळून संतुलित आहार घ्या.

मिथुन : प्रेम संबंधांमध्ये गोडवा वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. घसा, कान किंवा नाकाशी संबंधित त्रासापासून सावध राहा. व्यायाम आणि योग्य आहारावर भर द्या.

कर्क : आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. अनावश्यक जोखीम घेणे टाळा. आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

सिंह : आज दिवस आनंददायी आणि लाभदायक राहील. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. आईच्या तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या : रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. कुटुंबाचे सहकार्य मिळेल आणि आरोग्यही चांगले राहील.

तुळ : कामाचा ताण वाढू शकतो. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान आणि योगामुळे मानसिक शांतता मिळेल.

वृश्चिक : विद्यार्थ्यांसाठी दिवस यशदायी ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. जमीन किंवा वाहनातून लाभ होण्याची शक्यता आहे. घाईघाईत निर्णय घेणे टाळा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु : करिअरमध्ये नवीन यश मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहिल्याने मन प्रसन्न राहील.

मकर : रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कामाच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील.कला आणि संगीताची आवड वाढेल.घरातील प्रश्न शांतपणे सोडवा.आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या.

मीन : धार्मिक आणि सामाजिक कार्यात मन रमेल.शिक्षण किंवा परदेशाशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. धनलाभाचे योग असून आरोग्याचीही काळजी घ्या.

डिस्क्लेमर: हे राशीभविष्य ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यातील माहितीची अचूकता किंवा पूर्ण सत्यता याची हमी दिली जात नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT