Horoscope Today Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Anjali Potdar

आजचे पंचांग

शनिवार,२१ सप्टेंबर २०२४,भाद्रपद कृष्णपक्ष,

संकष्टी चतुर्थी,भरणी श्राद्ध,चतुर्थी श्राद्ध.

तिथी- चतुर्थी १८|१४

रास-मेष ३०|०९ नं वृषभ

नक्षत्र- भरणी

योग- व्याघात

करण- बवकरण ०७|४२

बालव १८|१४

दिनविशेष- चांगला दिवस'

मेष - आपले व्यक्तिमत्व उजळून येईल. रुबाब वाढेल कामांमध्ये एक आगळा वेगळा वेग असेल. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.

वृषभ- मनस्ताप वाढेल नको ते खर्च वाट्यास येतील. वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. त्याची काळजी घ्यावी. खूप मोठा दिवस आहे असा भास होईल.

मिथुन- "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" काही वेळेला स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या गोष्टींमध्ये लाभ मिळतील. नातेवाईकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतील.

कर्क - राजकारण समाजकारणामध्ये यश मिळणार आहे. फिरतीचे प्रवास होतील. गाड्यांचे आपल्याला विशेष आकर्षण आहे. अशाच काही नवीन गाड्यांची निगडित आज आपला संबंध येईल.

सिंह - भाग्य फळफळणारा असा आजचा दिवस आहे. नशिबात जेवढे आणि जितके लिहिले असते तेवढे तर मिळतेच. यावरचा विश्वास आपला दृढ होईल. उपासना मार्गामध्ये मार्गक्रमण कराल.

कन्या - चुकीच्या गोष्टी मध्ये अडकू नका. कागदपत्र, कोणतीही लेखापढी किंवा दस्तऐवज यामध्ये मोठी रिस्क घेऊन नका. लाचलूचपत, बंडलबाजी यामध्ये आज अडकण्याची दाट शक्यता आहे .

तूळ - अनेक दिवस रखडलेल्या गोष्टी आज सहजगत्या होताना दिसतील. जोडीदाराचे साथ उत्तम मिळेल अनेक भविष्याची स्वप्न ही रंगवाल .असेच सुख अबाधित राहो अशी आपली भावना होईल.

वृश्चिक- आजोळी संपर्क येईल. मामा विषयी काही संमिश्र गोष्टी कानावर येतील. विनाकारण मनाची चिंता वाढणारा आजचा दिवस आहे. ज्यांची आपल्यापुढे उभे राहण्याची पण पात्रता नाही अशा लोकांकडून अपमान होतील.

धनु -दत्तगुरूंची उपासना विशेष फलदायी ठरेल.हाती घेतलेला कामाला आज यश मिळणार आहे. पैशाची निगडित काही गोष्टी ठरवल्या असतील तर ती गुंतवणूक किंवा आय चांगला राहील.

मकर - घरातील ज्येष्ठ व्यक्तीची जबाबदारी अंगावर येईल. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. सर्वांच्या सहकार्याने अडचणीच्या गोष्टीतून सहज बाहेर याल. मन आणि चित्त दोन्ही स्थिर ठेवा.

कुंभ - "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" ममात ठरवलेल्या गोष्टी नेटाने कराल. दोनाचे चार हात असते तर बरे झाले असते असे भावना येईल. कामाचा रगाडा वाढेल. पण त्यातच स्वतःला गुंतवून घ्याल.

मीन - काहीतरी वेगळे करावे अशी भावना येईल कुटुंबीयांबद्दल एक वेगळी आस्था निर्माण होईल. आपल्या प्रेमामुळे कुटुंबीय अस्वस्थ होतील. दिवस चांगला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: बापरे..! रेल्वे स्टेशनमध्ये घुसला ६ फूट लांब साप, प्रवाशांची धावाधाव; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस

SBI Jobs: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची संधी; मिळणार ९३००० रुपये पगार; पात्रता काय?

Pune Crime: बुरखा घालून घरात शिरले अन् सपासप वार केले, मुलींच्या डोळ्यादेखत वडिलांची हत्या; पुणे हादरलं

Maratha vs OBC : वडीगोद्रीत मध्यरात्री काय घडलं? मराठा-ओबीसी बांधवांचा VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT