Maratha vs OBC : वडीगोद्रीत मध्यरात्री काय घडलं? मराठा-ओबीसी बांधवांचा VIDEO आला समोर

Maratha vs OBC Jalna wadigodri News : जालन्यातील वडीगोद्री फाट्यावर शुक्रवारी रात्री मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद केला होता.

जालना : जालन्यातील वडीगोद्री फाट्यावर शुक्रवारी (ता २०) रात्री मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद केला. यामुळे मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर मराठा समाजाच्या गाड्या का सोडता असं म्हणत ओबीसी आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

तेव्हा मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले होते. त्यामुळं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला. तुम्ही मराठा बांधवांची वाहने अडवून त्यांना का त्रास देत आहात. अधिकारी जातीवाद करत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

माझ्या किंकाळ्या मराठा बांधवांच्या कानावर पडायला लागल्या म्हणून तुम्ही त्यांना इकडे येण्यास मज्जाव करत आहात. तुमच्या बापाचा रस्ता आहे का असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. ज्या पोलिसांनी मराठा आंदोलकांना अडवलं होतं त्यांच्या निलंबनाची मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान काल रात्री मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आलेल्या ठिकाणी आता शांतता असून पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com