Rahu Nakshtra Gochar saam tv
राशिभविष्य

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Rahu Nakshtra Gochar 2024: ज्योतिष्य शास्त्रामध्ये राहु ग्रहाला कलियुगाचा राजा मानलं जातं. राहू ग्रहाने सध्या उत्तरा भाद्रपदाच्या तृतीय भावात प्रवेश केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये राहु ग्रहाला पापी ग्रह म्हणून ओळखलं जातं. राहु हा ग्रह तब्बल १८ महिन्यांनी त्यांची रास बदलतो. ज्योतिष्य शास्त्रामध्ये राहु ग्रहाला कलियुगाचा राजा मानलं जातं. अशा स्थितीत तो गरीबापासून राजापर्यंत कोणतीही राशी बनवू शकतो, असं म्हटलं जातं.

30 ऑक्टोबर 2023 रोजी राहु मीन राशीत वक्री अवस्थेत प्रवेश केला होता. राहू ग्रह वेळोवेळी नक्षत्रामध्ये देखील बदलणार आहे. राहू ग्रहाने सध्या उत्तरा भाद्रपदाच्या तृतीय भावात प्रवेश केला आहे. शनीच्या नक्षत्रात आल्यावर राहू अत्यंत बलवान झाला आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतंय ते पाहूयात.

वृषभ रास

राहू्च्या नक्षत्र गोचरचा या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. शेअर मार्केटमधून तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. कोणतीही गुंतवणूक कराल तर तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकणार आहे. करिअर आणि बिझनेसमधूनही चांगला नफा मिळू शकणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठीही राहूचं नक्षत्र गोचर लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामाचं फळ मिळणार आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या लोकांना तुम्हाला आराम मिळू शकतो. तुम्ही व्यवसायात प्रचंड यश मिळवून आर्थिक नफा देखील मिळवू शकता. दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी तुमच्या मन्याजोग्या घडणार आहेत.

तूळ रास

राहू या राशीच्या सहाव्या घरात आहे. या काळात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्यविषयक समस्या आता संपुष्यात येतील. नोकरीतही खूप फायदा होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांनाही लाभ मिळू शकणार आहे. तुम्हाला या काळात परदेशात जाण्याची संधी मिळू शकणार आहे. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता पूर्ण होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांची चिंता मिटली! धरणातील पाणी पातळीत वाढ; शहरात तूर्तास पाणीकपात नाही

घड्याळाच्या जाहिरातीत नेहमी 10:10 हीच वेळ का दिसते?

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Police Officer Transfer: मोठी बातमी! ६ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडक्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Tourism : पावसाळ्यात सुंदर दिसणारे पण धोकादायक आहेत 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स, जाण्याआधी १०० वेळा विचार करा

SCROLL FOR NEXT