Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Shukra Nakshatra Gochar: ठराविक काळानंतर शुक्र त्याच्या राशीसोबतच नक्षत्रही बदलतो. शुक्राचं अनुराधा नक्षत्रात गोचर झालं आहे.
Shukra Nakshatra Gochar 2024
Shukra Nakshatra Gochar 2024saam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या राशीत बदल करतो. त्याचप्रमाणे काही ग्रह त्यांच्या नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. १६ ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह त्याच्या नक्षत्रामध्ये गोचर केलं आहे. शुक्र ग्रह हा मान, सुख, विलास, संपत्ती आणि कीर्तीचा कारक मानला जातो.

ठराविक काळानंतर शुक्र त्याच्या राशीसोबतच नक्षत्रही बदलतो. सध्या शुक्र विशाखा नक्षत्रात स्थित आहे. तर शु्क्राने नक्षत्र गोचर केलं आहे. 12:12 वाजता शुक्राचं अनुराधा नक्षत्रात गोचर झालं आहे. शुक्राचं हे नक्षत्र गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Shukra Nakshatra Gochar 2024
Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

वृषभ रास

शुक्राचा रास बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांचा पगार वाढण्याची शक्यता आहे. जे व्यवसाय करतात त्यांचे ग्राहकांशी संबंध दृढ होणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळू शकणार आहे. कुटुंबात काही वाद असतील तर ते दूर होणार आहेत.

धनू रास

धनु राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकणार आहेत. या काळात नवीन सौदे होणार आहेत. या माध्यमातून तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

कुंभ रास

शुक्र ग्रहाचं नक्षत्र गोचर खूप लाभदायक मानलं जातं. पैशाच्या समस्यांपासून सुटका मिळू शकणार आहे. तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश असणार आहे. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्याही सोपवल्या जाऊ शकतात. कोर्ट कचेरीच्या बाबतीत तुमची सुटता होणार आहे.

Shukra Nakshatra Gochar 2024
Grah Gochar Horoscope: दिवाळीपूर्वी ४ ग्रहांच्या स्थितीत बदल; 'या' राशींचे आर्थिक प्रश्न मिटणार, कमाईच्या नव्या संधी उपलब्ध

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com