Rahu Shani Gochar 2024 Parivartan Rajyog saam tv
राशिभविष्य

Parivartan Rajyog: राहू-शनीने तयार केला पॉवरफुल 'परिवर्तन राजयोग'; 'या' राशींना बिझनेसमध्ये होणार नफा

Rahu Shani Gochar 2024 Parivartan Rajyog: राहू आणि शनीच्या नक्षत्राच्या बदलाबद्दल बोललो, तर प्रत्येक नक्षत्र दुसऱ्याच्या नक्षत्रात स्थित आहे. दोन्ही ग्रह एकमेकांच्या नक्षत्रात परिवर्तन राजयोग तयार होतोय.

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे राजयोग तयार होतात. सर्व नऊ ग्रहांपैकी शनि आणि राहू बद्दल बोलायचे तर ते सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानले जातात. प्रत्येक राशीच्या लोकांच्या आयुष्यात दोन्ही ग्रहांचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो. यावेळी राहू आणि शनीच्या नक्षत्राच्या बदलाबद्दल बोललो, तर प्रत्येक नक्षत्र दुसऱ्याच्या नक्षत्रात स्थित आहे.

दरम्यान यामुळे परिवर्तन नावाचा राजयोग तयार होतोय. ज्योतिष शास्त्रानुसार, राहुने ५ जुलै २०२४ रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला असून मार्च २०२५ पर्यंत तो या नक्षत्रात राहणार आहे. शनि शतभिषा नक्षत्रात स्थित आहे आणि 2025 पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रह एकमेकांच्या नक्षत्रात परिवर्तन राजयोग तयार होतोय. या योगामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि राहू खूप फायदेशीर ठरू शकणार आहेत. यावेळी या राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकणार आहे. शनिमुळे तुम्हाला कामाशी संबंधित लांब प्रवास करावा लागणार आहे. तुम्हाला चांगला फायदा मिळू शकणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडणार आहेत.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठीही परिवर्तन योग खूप फायदेशीर ठरू शकतो. राहूच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. परदेशात फिरण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे. यावेळी तुम्हाला व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे.

वृषभ रास

परिवर्तन राजयोगामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. मित्र आणि कुटुंबियांसोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. करिअरच्या क्षेत्रात बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. वेतनवाढ मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

Padar Song : 'पदर' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ, निक शिंदे -अनुश्री माने यांचा रोमँटिक अंदाज

Raveena Tandon: रविना टंडन- अक्षय कुमारचा गुपचूप झाला होता साखरपुडा, मात्र लग्न होण्याआधीच सपलं नातं

Gold Silver Price: दिवाळीपूर्वी सोन्याला झळाळी, किंमती गगनाला भिडल्या; सोनं ८०,००० पार तर चांदी स्थिरावली; वाचा आजच्या किंमती

Viral Video: धक्कादायक...! फोनवर बोलतानाच अचानक कोसळला, मित्रासमोरच गेला जीव, घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT