Rahu Gochar In Meen saam tv
राशिभविष्य

Rahu Nakshatra Gochar: मायावी ग्रह राहू करणार नक्षत्र गोचर; शनीच्या वर्चस्वामुळे 'या' राशींच्या तिजोरीत भरणार पैसा

Rahu Nakshatra Parivartan 2025: शनीच्या नक्षत्रात राहू ग्रहाचा प्रवेश काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यातील अडचणी दूर होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये गोचर करतो. यावेळी काही ग्रह गोचरप्रमाणे नक्षत्रामध्येही बदल करतात. यामध्ये राहू ग्रहाचा देखील समावेश आहे. जानेवारी महिन्यात राहू ग्रह त्याच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

12 जानेवारीला राहु ग्रह उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रावर शनिदेवाचं वर्चस्व आहे. त्यामुळे या परिस्थितीत शनीच्या नक्षत्रात राहू ग्रहाचा प्रवेश काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यातील अडचणी दूर होणार आहेत. तर काही राशींना करियरमध्ये चांगलं यश मिळणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना अधिक लाभ होणार आहे.

मेष रास

राहू ग्रहातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला प्रत्येक कामात चांगलं यश मिळू शकतं. अनेक दिवसांपासून पूर्ण होत नसलेली कामं लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्क रास

राहू ग्रहाचा नक्षत्र बदल कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळणार आहे. या काळात तुमची जीवनशैली सुधारणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकणार आहे. तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

सिंह रास

राहू ग्रहाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. या काळात तुम्हाला व्यावसायिक करारांमध्ये यश मिळू शकणार आहे. या काळात नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करून ताण घेऊ नका. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT