आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी रागाचा अनुभव घेतो. कुणी हळूहळू शांत होतं तर कुणी अगदी छोट्याशा गोष्टीवरूनही पटकन भडकतं. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जन्मतारीख आणि राशीचा आपल्या स्वभावावर मोठा प्रभाव पडतो. काही राशींचे लोक नैसर्गिकरित्या जास्त रागीट असतात आणि ताणतणाव किंवा अनपेक्षित परिस्थितीत लगेच चिडचिड करतात.
आज आपण जाणून घेऊया की कोणत्या राशींचे लोक सर्वाधिक रागीट मानले जातात. त्यांच्या रागामागचं कारण काय असतं आणि हा राग कसा नियंत्रित करता येतो.
मेष राशीचे लोक ऊर्जेसाठी ओळखले जातात. पण कधी कधी हाच उत्साह त्यांना राग आणतो. जेव्हा गोष्टी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत, तेव्हा हे लगेच भडकतात.
पटकन प्रतिक्रिया देतात.
छोट्याशा गोष्टीवरूनही नाराज होतात.
दुसऱ्यांचा दृष्टिकोन समजून घेण्यास वेळ घेतात.
दीर्घ श्वास घेऊन शांत राहण्याचा प्रयत्न करावा.
ध्यान किंवा योगाचा सराव करावा.
आपली ऊर्जा सकारात्मक कामांमध्ये वापरावी.
सिंह राशीचे लोक नैसर्गिकरित्या आत्मविश्वासू आणि नेतृत्वगुण असलेले असतात. पण जेव्हा गोष्टी त्यांच्या मताप्रमाणे होत नाहीत, तेव्हा त्यांना राग अनावर होतो. त्यांच्या रागामागे प्रामुख्याने अहंकार आणि सन्मान टिकवून ठेवण्याची भावना असते.
दुसऱ्यांची चुकीची वागणूक पटकन सहन होत नाही.
रागात निर्णय घेण्याची घाई करतात.
कधी कधी कुटुंबीय किंवा मित्रांशी कठोर वागतात.
स्वतःचा अहंकार नियंत्रणात ठेवावा.
योग आणि प्राणायामाचा सराव करावा.
रागाच्या क्षणी लगेच प्रतिक्रिया देऊ नये.
वृश्चिक राशीचे लोक खोलवर विचार करणारे आणि भावनिक स्वभावाचे असतात. सामान्यतः हे शांत असतात, पण कुणी विश्वासघात केल्यास किंवा फसवल्यास हे प्रचंड रागावतात.
राग खूप काळ मनात ठेवतात.
थंड पण योजनाबद्ध प्रतिक्रिया देतात.
दुसऱ्यांच्या कमकुवतपणावर पटकन लक्ष ठेवतात.
क्षमा करण्याची आणि समजून घेण्याची सवय लावावी.
ध्यान आणि मानसिक शांतीचे उपाय करावेत.
रागात असताना मोठे निर्णय घेण्याचे टाळावे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.