Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Gajkesari Rajyog 2025: गजकेसरी राजयोग हा योग जेव्हा गुरु आणि चंद्र हे ग्रह एकाच राशीत किंवा एकमेकांपासून केंद्रस्थानी (१, ४, ७, १०) असतात तेव्हा तयार होतो. गुरु हा ज्ञान, बुद्धी, आणि समृद्धीचा कारक आहे
Gajkesari Yog
Gajkesari Yogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषानुसार, नवग्रहांमध्ये चंद्र हा सर्वात वेगाने चालणारा ग्रह मानला जातो. तो सुमारे दीड-दोन दिवसांत एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. त्यामुळे त्याचा वारंवार इतर ग्रहांशी संयोग होतो आणि त्यामुळे शुभ-अशुभ योग तयार होतात.

१८ ऑगस्ट म्हणजेच आज रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार असून त्याठिकाणी आधीच गुरु आणि शुक्र ग्रह बसलेले आहेत. या तीन ग्रहांच्या एकत्र येण्याने त्रिग्रही योग तयार होणार आहे. त्याचसोबत गजकेसरी राजयोग आणि कलात्मक योग निर्माण होत असल्याने १२ राशींवर त्याचा प्रभाव दिसून येणार आहे.

Gajkesari Yog
Budhaditya Rajyog: 12 महिन्यांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य योग; 'या' राशींना मिळू शकणार पद-प्रतिष्ठा

मिथुन राशि

मिथुन राशीत चंद्र, गुरु आणि शुक्र यांची युती होत असल्याने गजकेसरी राजयोग तयार होत आहे. यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. संतानाच्या शिक्षण, करिअर किंवा वैयक्तिक आयुष्याबाबत एखादी आनंदवार्ता मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात हवे तसे निकाल मिळतील.

Gajkesari Yog
Kendra Yog: 23 जूनपासून 'या' राशींची होणार चांदीच चांदी; सूर्य-शनी बनवणार केंद्र योग

कुंभ रास

कुंभ राशीसाठी गजकेसरी राजयोग अत्यंत फलदायी ठरणार आहे. आर्थिक क्षेत्रात वाढ होणार आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलणार आहेत. या काळात तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांना योग्य संधी मिळेल तर नोकरीत असणाऱ्यांच्या पदात वा पगारात वाढ होऊ शकते. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल.

Gajkesari Yog
Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com