Jupiter Transit 2024 Saam Tv
राशिभविष्य

Panchank Yog 2025: दिवाळीपूर्वीच पंचक योग 3 राशींना करणार मालामाल; गुरु-शुक्र मिळवून देणार पैसाच पैसा

3 zodiac signs financial gain: देवगुरू बृहस्पती (Jupiter) आणि दैत्यगुरू शुक्र (Venus) यांच्या शुभ स्थितीमुळे धनलाभाचे मोठे योग जुळून येत आहेत. दिवाळीपूर्वीच 'या' तीन राशींना कसा आणि किती धनलाभ होणार आहे, हे सविस्तर जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, बृहस्पति देवतांचं गुरु म्हणून ओळखले जातात. यावेळी गुरु ग्रह राशी बदल प्रत्येक राशीच्या जीवनावर काही ना काही प्रकारे परिणाम करणार आहे. सध्या गुरु अतिचारी गतीने भ्रमण करत आहेत. त्यामुळे ते वर्षात दोन वेगवेगळ्या राशींमध्ये प्रवेश करतील. सध्या ते मिथुन राशीत आहेत. पण 18 ऑक्टोबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान ते कर्क राशीत विराजमान राहतील.

कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर गुरु इतर ग्रहांसोबत युती किंवा दृष्टि निर्माण करतील. ज्यामुळे शुभ-अशुभ राजयोग तयार होतील. दिवाळीपूर्वी गुरु धनसंपत्तीचे कारक शुक्रासोबत संयोग करून दंशांक योग निर्माण करणार आहेत. या संयोगामुळे 12 राशींवर प्रभाव पडणार आहे.

गुरु-शुक्र पंचांक योग कधी तयार होईल?

वैदिक ज्योतिषानुसार, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 3 वाजून 21 मिनिटांनी गुरु आणि शुक्र एकमेकांपासून 72 अंशांवर येणार आहे. यावेळी पंचांक योग तयार होणार आहे. त्या वेळी शुक्र कन्या राशीत असणार आहे. जरी शुक्र आपला नीच राशीत असेल तरी गुरुच्या संयोगामुळे तयार झालेला दंशांक योग काही राशींवर सकारात्मक परिणाम घडवू शकणार आहे.

मेष रास (Aries)

मेष राशीसाठी गुरु-शुक्र पंचांक योग अत्यंत लाभकारक ठरू शकतो. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कुटुंबासोबतचा वेळ आनंददायी जाईल आणि शारीरिक तसेच मानसिक तणाव कमी होणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल आणि अध्यात्मिकतेकडे ओढ निर्माण होईल.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीसाठी पंचांक योग अनेक प्रकारे अनुकूल असेल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. नवीन यशाची संधी निर्माण होईल तसेच साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होईल. तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्हाला मोठे प्रोजेक्ट किंवा ऑर्डर मिळू शकते. गुंतवणूकीतून चांगला पैसा तुमच्या हाती मिळणार आहे.

मकर रास (Capricorn)

मकर राशीसाठी हा योग अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. गुरु या राशीत उच्च स्थानात सप्तम भावात असल्याने वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे. पार्टनरशिपमध्ये केलेल्या बिझनेसमध्ये नफा मिळणार आहे. समाजात मान-सन्मान वाढेल आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT