Rajyog: गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी बनणार हंस महापुरुष राजयोग, 3 राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

Hans Mahapurush Rajyog: गुरु ग्रह त्याच्या उच्च राशी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे हंस महापुरुष राजयोगाची निर्मिती होणार आहे. यामुळे काही राशींना खास लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Hans Mahapurush Rajyog
Hans Mahapurush Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या किंवा उच्च राशीमध्ये गोचर करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ राजयोग निर्माण होत असतात. या राजयोगांचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो.सध्या गुरू मिथुन राशीत गोचर करत आहे आणि ऑक्टोबरमध्ये तो त्याच्या उच्च राशी कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

दरम्यान ज्योतिष्य शास्त्रानुसार, गुरुच्या गोचरमुळे हंस महापुरुष राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग १२ वर्षांनी कर्क राशीत तयार होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Hans Mahapurush Rajyog
Venus Transit 2025: सिंगल लोकांची प्रतिक्षा अखेर संपणार; शुक्राच्या डबल गोचरमुळे या राशींना मनासारखा पार्टनर मिळणार

कर्क रास

हंस राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्नभावावर तयार होणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल.

तूळ रास

हंस राजयोगाची निर्मिती तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकणार आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठा नफा आणि नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

Hans Mahapurush Rajyog
Navpancham Rajyog: ३० वर्षांनंतर बनतोय पॉवरफुल नवपंचम राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार नवी नोकरी अन् पैसा

कन्या रास

हंस राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी लकी ठरणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि नफा स्थानावर होणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे.

Hans Mahapurush Rajyog
Early signs of kidney failure : किडनी सडू लागल्यास शरीरातील या अवयवांना येते सूज; चुकूनही दुर्लक्ष करू नका

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com