shash mahapurush rajyog saam tv
राशिभविष्य

Grah Gochar 2024: दिवाळीच्या दिवशी शनीच्या शश योगाचा होणार महासंयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार, कामाला मिळेल गती

Grah Gochar 2024: कार्तिक महिन्याच्या अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा केवळ सण केवळ धार्मिक नसून ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने देखील त्याच महत्त्व आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीचा सण आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा केवळ सण केवळ धार्मिक नसून ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने देखील त्याच महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी ग्रहांची स्थिती विशेष असते.

यंदाच्या वर्षी दिवाळी ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, यावर्षीची दिवाळी खूप खास आहे. याचं कारण म्हणजे ३० वर्षांनंतर असा महासंयोग बनतोय, दिवाळीच्या दोन्ही तारखांना कर्माचा अधिपती शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत असून खास शश राजयोगाची निर्मिती करणार आहे.

शनीदेवामुळे तयार झालेल्या या शश राजयोगाच्या निर्मितीचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. मात्र या काळात काही राशींच्या व्यक्तींना शश राजयोगाचा अधिक लाभ होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

शश राजयोगाच्या प्रभावामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकणार आहेत. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारीतून नफा वाढणार आहे. जुन्या कर्जातून सुटका मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळू शकतं.

सिंह रास

दिवाळीत तयार झालेल्या योगांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दिवाळीचे दिवस असल्याने या काळात चांगला बोनस मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्जनशील कार्याचं कौतुक होणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे.

धनू रास

धनु राशीच्या लोकांना शश राजयोग राजयोगाच्या प्रभावामुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होणार आहे. विद्यार्थ्यांना नोकरीत यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; २ सदस्यांचा पत्ता कट, नीलमसोबत 'हा' स्ट्राँग सदस्य जाणार घराबाहेर

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

Jio Recharge: कमी खर्चात जास्त फायदा, ३५५ रुपयांच्या जिओ प्लॅनचे फायदे जाणून घ्या

Pune: पुणे-नाशिक महामार्ग २२ तास रोखून धरला, रास्तारोको करणाऱ्या २५० जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT