Kendra Tirkon Rajyog: शनीदेव बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; ‘या’ राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Kendra Tirkon Rajyog: ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीला ३० वर्षांनंतर शश महापुरुष राजयोग तयार झाला आहे. त्याचसोबत शनी देव केंद्र त्रिकोण राजयोग देखील बनवणार आहे.
Kendra Tirkon Rajyog
Kendra Tirkon Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. यंदाची दिवाळी ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फार महत्त्वाची मानली जातेय. ३१ ऑक्टोबर रोजी शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे दोन खास राजयोग तयार होणार आहे.

दिवाळीला ३० वर्षांनंतर शश महापुरुष राजयोग तयार झाला आहे. त्याचसोबत शनी देव केंद्र त्रिकोण राजयोग देखील बनवणार आहे. अशा स्थितीत हे राजयोग तयार झाल्यामुळे काही राशींचे भाग्य दिवाळीत चमकू शकणार आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना या राजयोगांचा लाभ होणार आहे, ते पाहूयात.

Kendra Tirkon Rajyog
Shani Margi 2024: 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत होणार शनी मार्ग्रस्थ; 'या' राशींना होणार भयंकर त्रास

मेष रास

केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. नातेसंबंध मजबूत करणारा काळ ठरणार आहे. व्यावसायिकांना लक्षणीय यश मिळू शकणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीचे फायदे मिळणार आहे. या दिवाळीत व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

कुंभ रास

केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवाळी शुभ राहणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. या काळात तुमचं जीवन सुधारणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असणार आहे.

वृश्चिक रास

केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नाती अधिक घट्ट होतील. रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. या काळात नवीन बिझनेस डीलही होण्याची शक्यता आहे

Kendra Tirkon Rajyog
Grah Gochar Horoscope: दिवाळीपूर्वी ४ ग्रहांच्या स्थितीत बदल; 'या' राशींचे आर्थिक प्रश्न मिटणार, कमाईच्या नव्या संधी उपलब्ध

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com