Shani Margi 2024: 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत होणार शनी मार्ग्रस्थ; 'या' राशींना होणार भयंकर त्रास

Shani Margi 2024: दिवाळीच्या १५ दिवसांनंतर म्हणजेच १५ नोव्हेंबरला शनी मार्ग्रस्थ होणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात सतर्क राहावं लागणार ते पाहूयात.
Shani Gochar
Shani GocharSaam Tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह गोचरप्रमाणे मार्ग्रस्थ आणि वक्री चाल देखील चालतात. याची देवता शनी 15 नोव्हेंबरपासून मार्ग्रस्थ होणार आहे. न्यायाची देवता शनि सध्या स्वतःच्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहे. पण दिवाळीच्या १५ दिवसांनंतर म्हणजेच १५ नोव्हेंबरला शनी मार्ग्रस्थ होणार आहे.

जर शनी तुमच्यावर मेहरबान असेल तर तुमचे जीवन शांततेत जाऊ शकतं. पण शनी महाराज तुमच्यावर कोपले तर तुमचे जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शनीची ही मार्गी अवस्था काही राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात सतर्क राहावं लागणार ते पाहूयात.

Shani Gochar
Laxmi Narayan Yog: बुध-शुक्राने बनवला लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शनिची मार्गी स्थिती धोकादायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या त्रास होण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांचे मानसिक आरोग्य बिघडू शकणार आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी शनीच्या मार्गी स्थितीमुळे त्यांच्या जीवनात समस्या वाढू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी गोष्टी कठीण वाटणार आहेत. तुम्ही मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ होऊ शकतात. कठोर परिश्रम करूनच जीवनात यश मिळणार आहे. या काळात तुमच्या वैयक्तिक जीवनावर नकारात्मक परिणाम होणार आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शनीची मार्गी चाल हानीकारक ठरू शकणार आहे. तुमच्या आयुष्यात खर्चात वाढ होऊ शकते. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही काही बदल होणार आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सासरच्या मंडळींमुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. कुटुंबातील व्यक्तींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

Shani Gochar
Shukra-shani Yuti: दिवाळीनंतर होणार शुक्र-शनीचा संयोग; 'या' राशी होणार धनवान, करिअरमध्ये सुवर्णसंधी!

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com