राशिभविष्य

Dhanteras 2024 Horoscope: धनत्रयोदशीच्या रात्री बनणार त्रिग्रही संयोग; 'या' राशींच्या घरी भरभरून पैसा येणार!

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, यंदाची दिवाळी फार खास मानली जातेय. यावेळी दिवाळीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होणार आहेत. यंदाच्या वर्षी धनत्रयोदशी २९ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. यंदाची धनत्रयोदशी केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही विशेष असणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, धनत्रयोदशीला बुध, शुक्र आणि गुरु हे तीन शुभ ग्रह एका विशेष संयोगात सामील होणार आहे. म्हणजे या शुभ दिवशी आहेत म्हणजेच त्रिग्रही संयोग तयार होणार आहे. या दिवशी सर्व राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ मिळू शकणार आहे.

बुध 29 ऑक्टोबरला म्हणजेच धनत्रयोदशीच्या रात्री वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुध आणि शुक्र यांचा संयोग होणार असून त्याचबरोबर वृश्चिक राशीमध्ये तयार झालेल्या या द्विग्रही योगावर वृषभ राशीत बसलेल्या गुरूची प्रत्यक्ष आणि शुभ बाजू पडणार आहे. ज्यामुळे बुध, शुक्र आणि गुरु या तीन शुभ ग्रहांचा विशेष त्रिग्रही संयोग तयार होणार आहे. या योग कोणत्या राशींसाठी लकी ठरणार आहे ते पाहूयात.

तूळ रास

त्रिग्रही संयोगाच्या शुभ प्रभावामुळे तूळ राशीचे लोकांना सकारात्मक परिणाम मिळणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार असून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येणार आहे. त्याचप्रमाणे तुमचं आरोग्य सुधारण्यास देखील मदत होणार आहे.

धनु रास

बुध, शुक्र आणि गुरु या तीन शुभ ग्रहांच्या तिहेरी संयोगामुळे धनु राशीच्या व्यक्ती आशावादी राहणार आहेत. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या करिअरमध्ये नवीन आव्हाने येतील, जी सोडवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या व्यक्तींना त्रिग्रहीय संयोगाच्या प्रभावामुळे चांगले परिणाम मिळणार आहेत. तुमच्या चांगल्या प्रयत्नांचे शुभ परिणाम मिळू शकणार आहेत. पैशांची आवक वाढल्याने आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. लव्ह लाइफमधील संबंध अधिक दृढ होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जालन्यात गोरंट्याल विरुद्ध खोतकर रंगणार संघर्ष?

Goa Travel : गोव्याजवळील 'हा' Hidden Spot पाहिलात का? हिवाळ्यात भेट द्याच

Lay Avadte Tu Mala: "सरकारच्या जवळ कुणीही येऊ नये" सईने दिला इशारा 'लय आवडतेस तू मला' मालिकेमध्ये आला नवा ट्विस्ट

Normal Cholesterol Level: 10 पैकी 6 व्यक्तींना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या; सामान्यपणे तुमची कोलेस्ट्रॉल लेवल किती असली पाहिजे?

Headache Problem Solution: सतत डोकेदुखीचा त्रास होतो? मग करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT