Astrology Prediction saam tv
राशिभविष्य

Lucky zodiac signs: एक नाही ४ ग्रह मे महिन्यात बदलणार रास; या ३ राशींच्या हाती येणार पैसाच पैसा

May 2026 horoscope: मे 2026 मध्ये सूर्य, शुक्र आणि बुध यांच्या राशी बदलामुळे काही राशींचं नशीब उजळणार आहे. करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता असून जाणून घ्या कोणत्या राशींना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मे महिन्यात ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य, मंगळ, शुक्र आणि बुध या चार महत्त्वाच्या ग्रहांच्या बदलामुळे काही राशींचे नशीब उजळणार आहे. या बदलांचा परिणाम करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यावर स्पष्टपणे जाणवणार आहे.

मे महिन्यात सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं आणि त्याच्या या बदलामुळे काही राशींना सरकारी कामांमध्ये यश, आत्मविश्वासात वाढ, नेतृत्वगुण आणि समाजात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

१४ मे रोजी शुक्र ग्रह राशी बदल करून मिथुन राशीत जाणार आहे. शुक्राच्या या गोचरामुळे सुख-वैभवात वाढ होणार आहे. खास करून वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळणार आहेत. तर १ मे २०२६ रोजी बुध अस्त होणार आहे आणि १५ मे रोजी तो वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुध यांची युती होऊन बुधादित्य योग तयार होणार आहे. यावेळी ग्रहांच्या स्थितीबदलाचा कोणत्या राशीला फायदा होणार आहे ते पाहूयात.

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी मे महिना आत्मविश्वास आणि यश घेऊन येणार आहे. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता आहे. सूर्याचा सकारात्मक प्रभाव आणि मंगळाचा प्रवेश यामुळे अडकलेली कामं पूर्ण होणार आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. ग्रहांची अनुकूल स्थिती तुमच्या उत्पन्नात वाढ घडवू शकणार आहे. व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यातही आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. मात्र योग्य निर्णय घेऊन योजना अधिक मजबूत करणं गरजेचं ठरेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मे महिना दिलासा देणारा ठरणार आहे. मानसिक तणाव कमी होणार आहे. पूर्वीच्या समस्या हळूहळू सुटणार आहे. आर्थिक अडचणीही कमी होण्याची शक्यता आहे.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

Kitchen Hacks : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

SCROLL FOR NEXT