Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham rajyog: 30 वर्षांनंतर बनणार नवपंचम राजयोग; 'या' राशींवर राहणार शनी-सूर्याची कृपा, मिळणार पैसाच पैसा

Navapancham Rajyog formation: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांची विशिष्ट स्थिती अनेक शुभ-अशुभ योग तयार करतात. यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ योग म्हणजे 'नवपंचम राजयोग'. साधारणतः ३० वर्षांनी शनिदेव आपल्या राशीचक्राचे एक पूर्ण चक्र पूर्ण करतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीत बदल करतात. या माध्यमातून काही विशिष्ट आणि प्रभावी योग तयार करतात. हे योग केवळ वैयक्तिक आयुष्यावरच नव्हे तर देश आणि समाजाच्या पातळीवरही प्रभाव टाकतात. याच पार्श्वभूमीवर शनी देव आणि सूर्य देव एकत्र येऊन एक अतिशय शुभ योग नवपंचम राजयोग तयार करत आहेत. विशेष म्हणजे, हा योग तब्बल ३० वर्षांनंतर घडतो आहे.

या योगामुळे काही राशींच्या नशिबाला नवी चालना मिळणार आहे. अचानक धनलाभ, अडकलेली कामं पूर्ण होणं, नवी घरगाडी घेण्याचे योग, करिअरमध्ये मोठी उडीअशा अनेक गोष्टी घडू शकतात. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कर्क रास

कर्क राशीसाठी नवपंचम राजयोग अतिशय फलदायी ठरू शकतो. नवपंचम योगामुळे तुम्हाला मोठे फायदे होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. काही अडकलेली कामं पुन्हा सुरू होणार आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही नवपंचम राजयोग शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या नशिबाला साथ मिळेल. तुमचं म्हणणं लोक मनापासून ऐकतील, तुमची छाप पडेलेली राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही वेळ फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाजू अधिक बळकट होणार आहे. शिक्षण क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांना विशेषतः स्पर्धा परीक्षांत यश मिळण्याची शक्यता आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठीही हा नवपंचम राजयोग अतिशय शुभ ठरू शकतो. विवाहित लोकांना कुटुंबाचा भरभरून आधार मिळणार आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. या काळात ज्योतिष, अध्यात्म, पूजा-पाठ, कथा वाचन किंवा अध्यापन यांसारख्या क्षेत्रात असणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढत दिला चोप; पाहा VIDEO

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT