Nag Panchami Horoscope  meta ai
राशिभविष्य

Nag Panchami Horoscope : नागपंचमीपासून या 3 राशींचे नशीब अचानक चमकणार; पैशांचा पाऊस पडणार, तुमच्या भाग्यात काय?

Nag Panchami Astrology : नागपंचमीपासून मेष, सिंह आणि धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. सूर्य गोचरामुळे तयार होणारा विशेष योग त्यांच्यासाठी शुभ ठरू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

नागपंचमीचा सण यंदा १७ ऑगस्ट २०२६, सोमवार रोजी साजरा केला जाईल. यंदाची नागपंचमी विशेष मानली जातेय. कारण हा सण श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारी येत आहे. त्याच दिवशी आत्मविश्वास, मान-सन्मान आणि प्रतिष्ठेचा कारक मानला जाणारा सूर्य देव राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे नागपंचमी, श्रावण सोमवार आणि सूर्य गोचर असा विशेष योग तयार होत आहे.

ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, भगवान शिव, नाग देवता आणि सूर्य देव यांच्या कृपेचा हा संगम काही राशींसाठी शुभ परिणाम देऊ शकतो. या काळात आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच करिअर आणि व्यवसायातही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः मेष, सिंह आणि धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो.

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा योग भाग्यवृद्धीचा ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामे करण्यासाठी उत्साह निर्माण होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. व्यवसायात केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य नियोजन करणे फायदेशीर ठरेल.

सिंह राशी

सूर्य हा सिंह राशीचा स्वामी असल्याने हा योग या राशीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. कार्यक्षेत्रात मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठा वाढू शकते. सरकारी कामे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

धनु राशी

धनु राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक ठरू शकतो. आर्थिक अडचणी किंवा काही काळापासून सुरू असलेल्या अडथळ्यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभ किंवा मंगलकार्य होऊ शकते. पैतृक संपत्तीशी संबंधित बाबतीतही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

शुभ फलासाठी कोणते उपाय करावेत?

नागपंचमी आणि श्रावण सोमवारी शिवलिंगावर दूध, जल आणि बेलपत्र अर्पण करा. सकाळी तांब्याच्या कलशात जल आणि रोळी मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. तसेच नागदेवतेची श्रद्धेने पूजा करून राहू-केतूच्या दोषांपासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी.

टीप: वरील माहिती ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT