Sakshi Sunil Jadhav
आधार कार्डाची ई केवायसी केल्याने ग्राहकाची ओळख आणि LPG कनेक्शनची माहिती पडताळली जाते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही प्रोसेस महत्त्वाची आहे.
सध्या १६ ऑगस्ट २०२६ ही e-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख असल्याचे सांगितलं आहे. मात्र, ग्राहकांनी संबंधित तेल कंपनी किंवा अधिकृत सरकारी माध्यमातून अंतिम माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.
e-KYC पूर्ण केली नाही तर LPG च्या सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात. पण १६ ऑगस्टनंतर प्रत्येक ग्राहकाचे कनेक्शन बंद होईल असं नाही.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी e-KYC जास्त महत्त्वाची आहे. e-KYC पूर्ण नसेल तर भविष्यात सब्सिडीशी संबंधित अडचणी येऊ शकतात.
ग्राहकांना घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून e-KYC पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत मोबाइल अॅप आणि आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनची सुविधा वापरता येते.
इंडेन ग्राह IndianOil ONE अॅपच्या माध्यमातून e-KYC प्रक्रिया सुरू करू शकतात. त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन आणि फेस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
भारत गॅसचे ग्राहक Hello BPCL अॅपचा वापर करून आधार आधारित e-KYC करू शकतात. ओळख पडताळणीसाठी अॅपमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
एचपी गॅस ग्राहक HP Pay अॅपच्या मदतीने e-KYC प्रोसेस पूर्ण करू शकतात. आधार व्हेरिफिकेशन आणि फेस ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतर KYC प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
स्मार्टफोन नसेल किंवा ऑनलाइन e-KYC करताना अडचण येत असतील तर ग्राहकांनी जवळच्या LPG वितरक किंवा गॅस एजन्सीशी संपर्क साधावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.