Saam Tv
श्रावण सुरू झाला की अनेक सण उत्सव सुरू होतात. नागपंचमी, जन्माष्टमी ,रक्षाबंधन आणि श्रावणी सोमवारचे उपवास देखील सुरू होतात.
श्रावणात येणारे १६ सोमवार हे शिवाला समर्पित असतात. श्रावण महिना शिवभक्तीसाठी श्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे या काळात भक्तिमय वातावरण असते.
चालत आलेल्या प्रथेनुसार अविवाहीत मुली चांगला आणि योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून प्रार्थना करतात. यासाठी स्वच्छेने १६ सोमवारचे व्रत करतात.
पौराणिक कथांनुसार माता पार्वतीने शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती, अशी मान्यता आहे.
शंकराना आदर्श पती मानले जाते. प्रत्येक मुलीला त्यांच्यासारखे गुण असणारा पती मिळावा अशी इच्छा असते. त्यामुळे मुली हे व्रत करतात.
विवाहित महिलाही पतीच्या दिर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनात सुख मिळवण्यासाठी हे व्रत करतात.
या व्रतामध्ये सलग १६ सोमवार शिवाची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारपासूनच या व्रताची सुरूवात होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.