Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : जुने मित्र भेटणार, शत्रूंवर मात कराल; ५ राशींच्या लोकांच्या जुन्या गोष्टी नव्याने जुळून येतील

Monday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना जुने मित्र भेटतील. तर काही जण हित शत्रूंवर मात करतील.

Anjali Potdar

पंचांग

सोमवार,१७ नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष.

तिथी-त्रयोदशी (अहोरात्र)

रास-कन्या १५|३५ नं. तुला

नक्षत्र-चित्रा

योग-प्रीतियोग

करण-गरज

दिनविशेष-वृद्धितिथी

मेष - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. आपले कोण परके कोण ओळखून पुढे जा. मात्र हित शत्रूंवर मात कराल. आजोळी संबंध दृढ होतील.

वृषभ - मुला मुलींचे प्रश्न आज मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात नव्याने धाडस करायला हरकत नाही. लक्ष्मीची विशेष कृपा आज तुमच्यावर राहील. कलाक्षेत्रात घोडदौड होईल.

मिथुन - तुमच्या क्षेत्रांमध्ये सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभणार आहे. नव्याने वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस आज सुदिन आहे म्हणायला हरकत नाही.

कर्क - जिद्द आणि चिकाटी घेऊन कामामध्ये कार्यरत रहाल. नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नवनवीन संधी आज आपल्या आयुष्यात येणार आहेत.त्याचे सोने करा.

सिंह - इतरांवर आपली पगडा राहील. आपला पगडा राहील. मात्र तसेच जबाबदारीने कुटुंबीयांसाठी कामे करावी लागतील. मेहनतीला पर्याय नसेल पण एक वेगळा आनंद आज मिळेल. कुटुंबात रमाल.

कन्या - आपली बौद्धिक तसेच अर्थतत्वाची असणारी रास आहे. आर्थिक लाभाचे आज प्रमाण मनाप्रमाणे, समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होणार आहेत. दिवस मनासारखा जाईल.

तूळ - महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर उरकून घ्या. विनाकारण खर्च वाढणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. ध्यानीमनी नसताना पुढे अडचणी उभ्या राहतील. दिवस संमिश्र आहे.

वृश्चिक - प्रियजनांचा सहवास लाभेल. दिवस चांगला जाईल. नव्याने हितसंबंध निर्माण होणार आहेत. थोडी आपल्या स्वभावाला मुरड घातली तर जुन्या गोष्टी सुद्धा नव्याने जुळून येतील. धनलाभ उत्तम.

धनु - वरिष्ठांच्या सहकार्याने पुढे जाल. शासकीय कामे सुद्धा मार्गी लागतील. मनाची दोलायमान अवस्था टाळणे आज गरजेचे आहे. कर्म प्रधान ठेवून कामे करावीत.

मकर - मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभून प्रगतीचे योग आज सहज जुळून येणार आहेत. भाग्याची दालने खुली होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सद्गुरूंचे विशेष आशीर्वाद आज लाभतील.

कुंभ - अडीअडचणींना कारण लागत नाही. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. वाहने जपून चालवावीत. आपण सावधगिरीने कामे करणे आज गरजेचे आहे. इतरांना दोष देऊन उपयोग नाही.

मीन - तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला आज लाभदायक ठरेल. काही गोष्टी इतरांच्या सल्ल्याने गेल्याने फायदा होतो हे आज जाणवेल. कोर्टाच्या कामात मनासारखे यश मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एमआयएम जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार

Curly Hair Care Tips: कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यावी? वाचा स्टेप बाय स्टेप

एमआयएमचे ३३ नगरसेवक जिंकले, Imtiaz Jaleel यांच्यावर पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल

EPFO Withdrawal Rule: रिटायरमेंटआधी कोणत्या कारणांसाठी काढू शकतात PFचे पैसे; वाचा EPFO चे नियम

रशियाशी मैत्री महागात पडली, अमेरिकेनं उलथवली 7 देशांची सत्ता

SCROLL FOR NEXT