Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या संसारात वाढणार गोडी गुलाबी; तर काहींचे होणार मतभेद, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांच्या संसारात गोडी गुलाबी वाढणार आहे. तर काहींचे मतभेद होण्याची शक्यता आहे. वाचा सोमवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,८ सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,ग्रहण करिदिन,प्रतिपदा श्राद्ध.

तिथी- प्रतिपदा

रास-कुंभ १४|२९ नं. मीन

नक्षत्र-पूर्वभाद्रपदा

योग-धृति ०६|३०

शूल २७|२०

करण-बालव

दिनविशेष- करिदिन

मेष - प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराचे काय म्हणणे आहे हे आज ऐकून घेणे गरजेचे आहे. कदाचित मतभेद होण्याची शक्यता आहे. धन योगाला मात्र दिवस उत्तम आहे. गुंतवणुकीतून लाभ आहेत.

वृषभ - कलाकारांना दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे. नवनवीन कल्पनेच्या भराऱ्या आज कामात वेगळेपण आणतील. प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

मिथुन - भाग्यकारक घटनांचा कालखंड असा आजचा दिवस आहे. विष्णू उपासना दमदार फळे देणार आहे. तीर्थक्षेत्रे भेटी होतील. मोठे प्रवास होतील. मनोकामना पूर्ण होणार आहेत.

कर्क - "नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न" असा काहीसा आज दिवस आहे. काम करायला घेतलं की अडथळे हे ठरलेलेच आहेत. मानसिकता आणि भावनिकता सकारात्मक ठेवून आव्हाने पेलून घ्या.

सिंह - जोडीदाराची आरती ओवाळावी लागेल. कितीही केलं तरी "सुसरबाई तुझीच पाठ माऊ" आज तिला समजून घेतल्यास संसारात गोडी गुलाबी राहील. अनेक जबाबदाऱ्या आणि पुढाकार घेऊन कामे करावी लागतील.

कन्या - पोटशुळ्चे त्रास, मानसिक ताण, तणाव अशा काही गोष्टी आज वाट्याला येणार आहेत." थकून जा पण वाकून जाऊ नका" हेही क्षण जातील अशी सकारात्मकता बाळगा. दिवस संमिश्र आहे.

तूळ - प्रेमामध्ये गुलाबी रंग बहरणार आहेत. एक वेगळी उमेद घेऊन कामे कराल. कला, क्रीडा क्षेत्र इतर व्यावसायिक गोष्टींसाठी आजचा दिवस "चेरी ऑन द टॉप" असा असणार आहे.

वृश्चिक - आपली मंगळ प्रधान असणारी रास. आज जागा खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये विशेष फायदा होईल. वेगवान वाहनावर चांगली मांड बसेल. वाहन सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

धनु - "आईये पधारीये"असा काहीसा सन्मान आपल्याला आज मिळणार आहे. आपल्या जवळच्या लोकांकडून वेगळीच प्रशंसा शाब्बासकीची थाप मिळाल्यामुळे ऊर भरून येईल. पुढील कामाला उत्तम गती मिळेल.

मकर - "थेंबे थेंबे तळे साचे" ही म्हण आज आपल्याला लागू होणार आहे. पैशाने पैसा जोडा. चिकटपणा हा आपल्या राशीचा आज असणारा गुण शुभ ठरणार आहे. कामामध्ये व्यस्तता राहील.

कुंभ - नवे काहीतरी सातत्याने करण्याचा अट्टाहास आज पूर्णत्वाला जाणार आहे.संशोधनात्मक कार्यात गती मिळेल. आरोग्य उत्तम राहील. नियोजित कार्य मनासारखी घडतील.

मीन - व्यवसायामध्ये अडथळे आणि अडचणी येतील. सोप्या गोष्टी अवघड ठरतील. महत्त्वाच्या ऐवज यांना सांभाळा. विशेष करून आज आपल्या राशीला बंधन योग आहेत. काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT