ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना व्यायाम करायला, फिट राहायला आवडते. यासाठी निरोगी आहाराची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. परंतु कधीही रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात नाही.
पोट जास्त वेळ भरलेले राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम करण्याआधी काय खाल्ले पाहिजे, जाणून घ्या.
सकाळच्या व्यायामापूर्वी तुम्हाला कार्बोहायड्रेट आणि प्रथिनेयुक्त आहार घ्यावा लागेल.
तुम्ही व्यायाम करण्याआधी दलिया खाऊ शकता. यामध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते.
जिमला जाण्याआधी ओट्स खा. ओट्स पोटासाठी हलके असून यामध्ये प्रोटीन असते.
तुम्ही उकडलेलं अंड देखील खाऊ शकता. यामध्ये प्रोटीन असते जेणेकरुन व्यायामासाठी तुम्हाला उर्जा मिळेल.
तुम्ही केळी, ड्राय फ्रुट्स मिक्स करुन बनाना स्मूदी देखील बनवू शकता. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन आणि प्रोटीन असते.