ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्पर्म म्हणजेच शुक्राणूंची संख्या ही पुरुषांच्या प्रजनन क्षमतेचे एक महत्त्वाचे मापक मानले जाते.
स्पर्म काउंटला वैद्यकीय भाषेत स्पर्म कॉन्संट्रेशन देखील म्हटले जाते.
सामान्य स्पर्म काउंट १५ दशलक्ष/मिली किंवा त्याहून अधिक असते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या गोष्टी खाल्ल्याने स्पर्म क्वालिटी सुधारते किंवा वाढू शकते, जाणून घ्या.
शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया खाऊ शकता. भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे पुरुषांच्या अवयवात रक्ताभिसरण वाढवण्याचे काम करतात.
अक्रोड शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहेत.
शुक्राणूंची संख्या आणि त्याची गुणवत्ता वाढवण्याचा हा एक प्रभावी मार्ग मानला जातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.