Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप घडला होता. अगदी तसाच राजकीय भूकंप उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मात्र त्याचं नेमकं कारण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Vice President Election 2025
Vice President Election 2025: Political battle heats up between Reddy and RadhakrishnanSaamtv
Published On
Summary
  • उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक ९ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

  • जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक जाहीर झाली.

  • रेड्डी आणि राधाकृष्णन हे प्रमुख उमेदवार असून मुकाबला चुरशीचा अपेक्षित आहे.

  • या निवडणुकीमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते.

जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाचा निवडणूक जाहीर झालीय..9 सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.मात्र या निवडणुकीनंतर राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्याला कारण ठरलंय. भाजपने सी पी राधाकृष्णन यांना तर काँग्रेसने बी सुदर्शन रेड्डींना रिंगणात उतरवून प्रतिष्ठेची बनवलेली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक.

ही निवडणूक जिंकायचीच हा चंग बांधलेल्या एनडीए आणि इंडिया आघाडीने दिल्लीत बैठकांचा सपाटा लावलाय. मात्र कोणत्या पक्षाकडे किती मतं आहेत? पाहूयात. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील 786 खासदार मतदान करणार आहेत. त्यात भाजपचे राज्यसभा आणि लोकसभेत 340 खासदार आहेत. त्यात एनडीएच्या खासदारांची भर पडल्यास ही संख्या 430 इतके होते. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे 313 खासदार आहेत. तर आपचे 12 खासदार आहेत. यासोबतच तटस्थ मतं इंडिया आघाडीकडे वळल्यास आघाडीचं संख्याबळ 356 इतकी होते.

खरंतर भाजपनं तामिळनाडूतील सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन ओबीसी कार्ड खेळलंय. तर काँग्रेसनेही तेलंगणाच्या बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी देत एनडीएतील तेलगू देसम पार्टीसह आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पक्षांची प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर कोंडी केलीय. त्यातच ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने बॅलेट पेपरवर होणार आहे.त्यामुळे मतं फुटीची शक्यता जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com