Monday Horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : नवदुर्गाची कृपा होणार, मनासारख्या घटना घडणार; ५ राशींच्या लोकांना धनलाभाचा योग

Monday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांवर नवदुर्गाची कृपा होणार आहे. तर काहींच्या मनासारख्या घटना घडणार आहे. वाचा सोमवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,२२ सप्टेंबर २०२५,अश्विन शुक्लपक्ष,घटस्थापना, नवरात्रारंभ,मातामह श्राद्ध.

तिथी- प्रतिपदा २६|५७

रास-कन्या

नक्षत्र- उत्तरा

योग-शुक्ल

करण-किंस्तुघ्न

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - आज घटस्थापने सारखा शुभ दिवस नव्याने संकल्प करायला हरकत नाही. दिवसभरात अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जाणार आहात. उष्णतेच्या तक्रारी डोके वर काढतील. त्यामुळे उपवास करताना सावधानता बाळगावी.

वृषभ - ही घटस्थापना आणि आजचा दिवस तुम्हाला शुभ गोष्टी आयुष्यात घेऊन आलेले आहेत. जसे की धन संपत्ती, सुवार्ता, उपासनेला श्रेष्ठ असा आजचा दिवस आहे. देवी उपासना करावी. फलदायी ठरेल.

मिथुन - धार्मिक कार्यामध्ये विशेषत्वाने आज सहभाग घ्याल. कुटुंबीयांच्या पाठिंबामुळे मनासारख्या घटना आज घडणार आहेत. प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार असतील तर असते मार्गी लागतील. दिवस चांगला आहे.

कर्क - कासवाच्या गतीने पण निश्चित यश मिळवणारी अशी आपली रास आहे. भले उद्दिष्ट तेवढे नीट नसले तरी तुम्ही प्रयत्न सोडत नाही. काही वेगळेपण घेऊन आजचा दिवस आलेला आहे. लेखन, प्रकाशन क्षेत्रात गती मिळेल. जवळचे प्रवास होतील.

सिंह - सणासुदीच्या दिवसांमध्ये आपली रास पैशाचा, खर्चाचा विचार करत नाही. आज दान, दानत उदारता चांगली राहील. जुनी येणी वसूल होतील. कुलधर्मामध्ये असलेला आजचा हा दिवस कुटुंबीयांच्या मध्ये आनंदवार्ता पेरेल.

कन्या - भावनिकता जपणारी सोज्वळ अशी आपली रास आहे. आज देवीच्या कृपेने आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि निर्णय आज पार पडतील. नव्याने संकल्प घ्या की जे सिद्धीस जातील. हिशोबामध्ये काटेकोर रहाल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ - खर्चाला धरबंध राहणार नाही. मानसिकता थोडी दोलायमान राहील. अध्यात्माची कास धरल्यास दिवस चांगला आहे. आजच्या शुभ दिनी मानसिकता स्पष्ट ठेवण्यासाठी विशेष उपासना फायद्याची ठरेल. बंधन योग आहेत.

वृश्चिक - कुलाधर्म अर्थात घटस्थापना आज श्रद्धापूर्वक केल्याने अनेक लाभ आपल्या आयुष्यात येणार आहेत. जुनी येणी वसूल होतील. काही गुंतवणुकी केलेल्या त्याचा परतावा मोठ्या प्रमाणे हाती येणार आहे. महत्त्वाचे निर्णय आणि बैठका पार पडतील.

धनु - कामाची धावपळ आणि दगदग आज जाणवणार आहे. पण तरीसुद्धा देवीचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहणार आहेत आणि कार्यक्षेत्रामध्ये वृद्धी होणार आहे.बढतीचे योग आहेत. सहकाऱ्यांची करार मदार आपल्यावर राहील.

मकर - "लेट पण थेट" जाणारी आपली रास आहे. तीर्थ टनाला जाऊन आज प्रगती होईल. उपासनेमधून वृद्धीचे दिवस दिसत आहेत. प्रेमामध्ये मनासारख्या गोष्टी आज घडणार आहेत. दिवस सुंदर आहे.

कुंभ - मनाचे घट आज भरलेले राहतील. ठाम निर्णयावर राहिल्यास पुढील वाटचाल सुकर होईल. देवीच्या कृपेने अचानक घबाड लागणे अर्थात मोठ्या धनलाभाचे योग दिसत आहेत. काळजी नसावी नव्याने कामाची वाढ होईल.

मीन - व्यवसायावर विशेष लक्ष केंद्रित कराल. नवे संकल्प, नव्या गोष्टी, नवीन परिचय, बैठका आणि नियोजन यामध्ये धावपळीचा आजचा दिवस असेल. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अर्थात आज देवीच्या रूपात आपल्याला पत्नीला पाहून सकारात्मकतेने कामे पार पाडाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : नाद करा, पण आमचा कुठं! भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अभिषेक- गिलने धू धू धुतलं

Laxman Hake: आरक्षणाचा वाद वाढणार; SC मधून 'या' समाजालाही आरक्षण द्या; लक्ष्मण हाकेंची नवी मागणी

India vs Pakistan: फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता सामना; कारण आलं समोर

Sahibzada Farhan Gun Celebration: वाह दुबे जी वा! स्लोअर बॉलवर ढेर अन् म्हणे 'गन' सेलिब्रेशन|Video Viral

Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

SCROLL FOR NEXT